सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ! जरांगे पाटलांचा 28 ऑगस्टचा अल्टिमेट; नोंदी प्रमाणे सर्व प्रमाणपत्र वाटप करा, सर्व गॅझेट लागू करा
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 2 min read

आंतरवाली: मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील आतरवाली सराटी येथे शनिवारी (दि.29) ऑगस्ट रोजी उपोषणास बसत आहेत. एकीकडे आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज सोमवारी (दि.24) सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला आंतरवाली सराटीमध्ये आले. माध्यमांसमोर शिष्टमंडळाशी चर्चेत त्यांनी शुक्रवार (दि.28 ऑगस्ट) पर्यंत सरकारला मागण्यांच्या अंमलबजावणीचा अल्टिमेटम दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आंदोलक जरांगे पाटील यांच्या भेटीला आज सरकारचे शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल झाले. मंत्री शुुंभराज देसाई, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आमदार प्रसाद लाड या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेवून मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला काही प्रश्न केले, ज्यामध्ये हैदराबाद गॅझेटचा जीआर काढलाय, तो खरा की खोटा. खरा असेल तर प्रमाणपत्र का वाटप करण्यात आले नाहीत. नोंदीप्रमाणे जे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याच्या पडताळण्या का नाही?. 58 लाख नोंदी प्रमाणे प्रमाणपत्र वाटप का केले नाहीत. वाटप का रोखले?. सातारा, कोल्हापूर, औंध गॅझेटसह बॉम्बे गव्हर्रमेंट गॅझेटचा जीआर आणि त्याची अंमलबजावणी यासह इतर मराठा आरक्षणाबाबत चे प्रश्न उपस्थित केले.
यावर मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार सकारात्मक आहे. नोंदी नुसार प्रमाणपत्र वाटपासाठी युद्ध पातळीवर मोहिम राबवणार असल्याचे सांगत दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर कारवाईचे अश्वासन दिले. शिवाय सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी महावधिवक्त्यांकडून मार्गदर्शन मागवून पुढील कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांना सवलतीबाबत सरकार सकारात्मक, प्रमाणपत्र पडताळणीमध्ये यापूढे राजकीय हस्तक्षेपाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. प्रमाणपत्र वाटपाबाबत अधिकार्यांची बैठक बोलावली आहे.त्यावर ठोस निर्णय घ्यावा लागेल, दुर्दैवाने काही ठिकाणी विघ्नसंतोषी अधिकारी आहेत अंमलबजावणी होवू देत नाहीत अशी कबुली देत विखे पाटील म्हणाले प्रसंगी काही अधिकार्यांवर कारवाईचे संकेत देत विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना आंदोलनाबाबत फेरविचार करण्याची विनंती केली.
जरांगे पाटील आंदोलनावर ठाम: सरकारच्या शिष्ठमंडळासोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपण आंदोलनावर ठाम असून सरकारने मागण्यांची दि. 28 पर्यंत आंमलबजावणी करण्याचा इशारा दिला. हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र वाटप व पडताळणी, सरकारने नियुक्त केलेल्या शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदीप्रमाणे जात प्रमाणपत्र का वाटप करण्यात आले नाहीत. जे वाटप झाले त्याच्या पडताळण्या रोखल्या आहेत. याचे उदाहरण जरांगे पाटीलयांनी जालना पडताळणी अधिकार्याला फोन लावून पडताळणीचे काय झाले असे विचारले असता अधिकार्याने लक्षात राहिले नाही असे उत्तर दिले. या संभाषणामध्ये मंत्री विखे पाटलांनीही सबंधीत अधिकार्यास काही सूचना दिल्या.



Comments