कॉक्रोच जनता पार्टीचे नागपूरात आंदोलन, अभिजीत दीपके यांचा आरएसएसवर घणाघात
- Navnath Yewale
- 10 hours ago
- 2 min read

नागपूर : राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाणीनंतर नापूरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. नागपूरच्या संविधान चौकात अभिजीत दीपके यांच्या प्रमुख उपस्थितीसह पार्टीच्या हजारो सदस्यांसमवेत आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनास मार्गदर्शन करताना अभितीत दीपके यांनी आरएसएसवर हल्लाबोल केला.
अभिजीत दीपके यांनी जयपूरमधील घटनेबाबत शांततेचे आवाहन करत, माहात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह माहपुरुषांच्या अहिंसेच्या विचारावर हा लढा लढला जात आहे. आणि मुद्यापासून विचलीत करण्यासाठी असे शारीरिक हल्ले घडवून आणले जात असून आम्ही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी एक्स पोस्टद्वारे दिला.
सोमवारी (दि. 15) जयपूरमधील घटनेनंतर मंगळवारी (दि.16) नागपूर येथील संविधान चौकात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले, उपस्थितांना मार्गदर्शन करताना दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनात विद्यार्थी तसेच नागरिक एकवटले. पेपर लीक आणि परीक्षांच्या व्यवस्थेवर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. आंदोलनातील सहभागी तरुण शिक्षण व्यवस्थेवरूद्ध आवाज उठवत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि अन्य गैरप्रकारांवर सरकारने लक्ष द्यावे असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या आंदोलनात पेपर लीक प्रकरण आणि परीक्षांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आंदोलनात सहभागी तरुण महत्वाच्या मुद्यांवर सरकारकडे आपले प्रश्न मांडताना दिसत आहेत पेपर लीकमुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी दिल्ली आणि जयपूर येथे आंदोलन करण्यात आले. आजा जयपूरनंतर नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा आहे. शिक्षण व्यवस्थेवर आवाज उठवण्याचा मोठा प्रस्ताव आहे.
दरम्यान आंदोलनापूर्वी पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके यांनी आरएसएसवर घणाघात केला, ते म्हणाले की, जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला करणारे आरएसएसचे लोक होते, असा आरोप त्यांनी केला. दिल्ली, पुणे आणि जयपूर नंतर आज सीजेपी नागपूरमध्ये आंदोलन करत आहे. त्यानंतर 20 जूनला पुन्हा दिल्लीत मोठं आंदोलन केलं जाणार आहे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार अभिजीत दीपके यांनी केला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अनेक परीक्षा झाल्या, त्यातील अनेक परीक्षेतील पेपर लीक झालेत. पंतप्रधान मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती दीपके यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, नीटच्या फेर परीक्षेपूर्वी केंद्र सरकारने टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे. त्यावरुन प्रतिक्रिया देताना दीपके यांनी सरकारला सवाल केला आहे. टेलिग्राममुळे काय फरक पडणार? पाच विद्यार्थी आत्महत्या करतात आणि अधिकार्याची फक्त बदली होते.
मग विद्यार्थ्यांची इतकीच किंमत आहे का? असा सवाल ही त्यांनी केला. आपल्यावर झालेला हल्ला हा बेरोजगारीमुळे झाला आहे. हल्ला करणार्याकडे नोकरी असती तर त्याने माझ्यावर हल्ला केला नसता. जयपूमध्ये झालेल्या हल्ल्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी अभिजीत दीपके आरएसएस विचारधारेचे आहेत, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना दीपके यांनी थेट आरएसएसवर आरोप केला.



Comments