top of page

शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण- दीपके

नीट पेपरफुटी, बरोजगारीसह युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली, पुणे (महाराष्ट्र),लखनऊ (उत्तरप्रदेश), चंदीगढ (पंजाब) नंतर राजस्थानमधील जयपूरमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन झाले. तत्पुर्वी संस्थापक अभिजीत दीपके यांना पार्टीच्या सदस्यांनी खांद्यावर उचलून घेत व्यासपीठाकडे जात असताना गर्दीतील दोन युवकांनी अभिजीत दीपके यांना हाताच्या चापटाने मारहाणीचा प्रकार घडला. या घटनेनंतर दीपके यांनी शांतता राखण्यो आवाहन केले.


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या एका टिप्पणीवरून उपाहासातून तयार झालेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांना जयपूर येथे मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जयपूर येथील शहीद स्मारक कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने सोमवारी (दि.15) आदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना कार्यकर्त्यांनी उचलून खांद्यावर घेतले. त्यावेळी गर्दीत घोषणा देत दोन युवकांनी अभिजीत दीपके यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशिलात मारली. तत्काळ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या दोघा युवकांना गर्दीतच गाठून बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी संतप्त कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.


जयपूर येथील शहीद स्मारकामध्ये आंदोलन सुरू असताना कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके परदेशातून (अमेरिका) भारतात येऊन नीट परीक्षा फुटी प्रकरणात आंदोलन सुरू केले आहे. आधी दिल्लीतील जंतरमंतर येथे पहिले आंदोलन झाले. त्यानंतर पुणे येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन झाले. उत्तरप्रदेश, पंजाब आणि आज राजस्थानमधील जयपुरमध्ये आंदोलन करण्यात आले. हाक देण्यात आली होती. नीट पेपरफुटी प्रकरणी जबाबदारी घेवून केंद्रीय शिक्षणमंत्री धमेर्र्ंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. दीपके मारहाण प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांचा एवढा फौजफाटा असताना दीपके यांना मारहाण झालीच कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी शांततेचे आवाहन करत आपल्या एक्स पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी म्हणाले की, ‘ मी गांधी आणि आंबेडकरांचा अनुयायी असून शांतता आणि प्रेमाने ही लढाई लढत राहीन. शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचे लक्षण असल्याचेही ते म्हणाले. पोस्टच्या शेवटी त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीना द्या अशी मागणीही केली आहे.

Comments


bottom of page