समाजाच्या वेदना मुकनायकायकातून प्रकट झाल्या- प्रा. श्रीराम जाधव बीडच्या शिरुरकासार तालुक्यात प्रथमच मुकनायकदिन साजरा
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

बीड : समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक सुरू केले होते, असे मत प्रा. श्रीराम जाधव व्यक्त केले. ते शिरूर कासार तालुक्यात प्रथमच साजऱ्या होत असलेल्या मुकनायक दिनानिमित्त बोलत होते.
शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन (तांबा) येथे मुकनायक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार पिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप मिसाळ, प्रमुख पाहुणे युवराज सोनवणे, माजी प्राचार्य सुधाकर खोले, समीर पठाण, आरती वक्ते, नंदकिशोर उपरे, कचरू महाडिक, कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद निकम, कल्याण तांबे, सिराज सय्यद, भीमराव खोले, दीपक खोले, दत्तात्रय तांबे, भारत पानसंबळ, विष्णू सवासे, बाळकृष्ण मंगरूळकर, प्रतीक भांडेकर, राम खोले, नाना औसरमल, भीमराव औसरमल, गौतम औसरमल यांची उपस्थिती होती.
चळवळीसाठी वृत्तपत्र आवश्यक असते. वृत्तपत्र नसलेली चळवळीची अवस्था पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते, असे विचार युवराज सोनवणे यांनी मांडले. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महान असून त्यांनी पत्रकारितेतही योगदान दिले आहे, याची माहिती अनेकांना नाही. या गोष्टीची माहिती होण्यासाठी मूकनायक दिन साजरा केला जातो. असे आपल्या भाषणात बोलताना माजी प्राचार्य सुधाकर खोले म्हणाले. यावेळी जगदंबा विद्यालय, राक्षसभुवन येथील मुख्याध्यापक नंदकिशोर उपरे आणि समीर पठाण यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश औसरमल, राज कातखडे, बाबासाहेब औसरमल, राहुल औसरमल, योगेश धनवे, आश्विन औसरमल, युन्नुस सय्यद, राम औसरमल, तात्यासाहेब सोनवणे, विशाल औसरमल, दीपक औसरमल, शिवनाथ औसरमल, सचिन खोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार नवनाथ येवले यांनी, सूत्रसंचालन जयेंद्र निकम तर आभार मनोहर औसरमल यांनी मानले.



Comments