आमदार रोहित पवारांकडून जाधव,माळी कुटुंबीयांचे सांत्वन दु:खवाटल्याने कमी होते, मदतीसह जबाबदारी घेत घडवले माणुसकीचे दर्शन

सातारा/ मुंबई : विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच त्याचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (पीएसओ) आणि फलटन तालुक्यातील तरडगावचे सुपुत्र विदीप जाधव व विकी माळी (क्रू मेंबर) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी काल जाधव तर आज माळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. एवढेच नाही तर, त्यांनी विदीप जाधव यांची मुलगी नेत्रा आणि मुलगा आद्विक यांच्या शिक्षणाची तर विकी माळी यांच्या भावाच्या वैमानिकासाठीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अत्यंत जवळून साथ देणारे अंगरक्षक विदीप जाधव यांचेही दुर्दैवाने विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याच बरोबर विकी माळी यांच्या पार्थिवावरही मुंबईयेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण प्रसंगी फलटणसह मुंबईतील इतर नेतेमंडळी जे करू शकले नाहीत, ते आमदार रोहित पवार यांनी करून दाखवले. आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या, नेत्रा आणि आद्विक यांच्या शिणिाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून जाधव कुटुंबाला मोठा आधार दिला. आज (दि.1 फेब्रूवारी) रोहित पवार विकी माळी यांच्या मुंबईस्थित घरी पोहोचले. माळी कुटुंबीयांचे सांत्वन करत कठीण प्रसंगी संपूर्ण पवार परिवार आपल्या सोबत असल्याचा धिर त्यांनी दिला. विकी माळीचे स्वप्न होते की माझा भाऊही पायलट व्हावा यासाठी विकी माळी रात्रीचा दिवस करत अहोरात्र मेहनत करत होती. विकी माळी यांच्या भावाच्या पायलट होण्यासाठीच्या शिक्षणाबाबत आमदार पवार यांनी काही अधिकार्यांशी संपर्क केला. अवश्यकत्या बाबींची पूर्तता करून विकी माळी यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हामीही त्यांनी यावेळी घेतली.

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “ विदीप जाधव यांनी अजितदादांचे अंगरक्षक म्हणून अनेक वर्षे काम केले होते. दुर्दैवाने दोघांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र जसा दु:खात आहे, तसेच विदीप जाधव व विकी माळी यांच्या कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दु:खवाटल्याने कमी होते, म्हणून फलटण (तरडगाव) व मुंबई इथं जाधव व माळी कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला. आमदार रोहित पवार यांनी केवळ सांत्वन करून आपले कर्तव्य संपवले नाही, तर त्यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची, तर विकी माळी यांच्या भावाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून एक कृतीशील संदेश दिला आहे. या घटनेतून त्यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे दर्शन घडले. पवार कुटुंबीयांना पुरोगामी आणि सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. आमदार रोहित पवार यांच्या या कृतीतून तेच संस्कार दिसून आले.



Comments