भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल...! अजित पवारांचा घातपात.. राऊतांचा ‘जस्टीस लोया कनेक्शन’ बॉम्ब ; संसदेत भाजपसरकारवर गंभीर आरोप
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर अन् संशय व्यक्त करणारे मुद्दे उपस्थित केले. याच मुद्यांचा संदर्भ घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपच्या घोटाळ्याची फाइल, असल्याचा अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! रहस्यमय रित्या मृत्यू झालेल्या ‘ जस्टीस लोया’ प्रकरणाचा दाखल देत, अजित पवार यांच्या विमानाचा उपघात की घातपात, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आज अजितदादांच्या अपघाती निधनाचा मुद्दा संसदेत मांडत भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी, अजित दादांचा अपघात आहे की घातपात आहे, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. यावरून राज्याच्या राजकारणात काहूर माजलं आहे. या शंकावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “ हे प्रकरण साधे नाही. अजित पवार मागे फिरले असते तर, भाजपची दहशत मोडून गेली असती. अजित पवारी वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे अन् मी ती उघड करेन. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली.”
अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी, अजित पवार यांच्या विमान आपघातावर अनेक शंका उपस्थित केल्यात.‘ जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर, पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जळून खाक झाले त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.
अजित पवार यांनीद अधीही भाजपच्या अजेंड्यावर काम केले नसल्याची खासदार राऊत यांनी सांगून ‘सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप केले. चौकशी लावल्या. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भाजपला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
अजितदादांचा राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून, संजय राऊत यांनी, ‘ पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शहा, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहराचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भाजपने गिळून टाकला आहे.
खासदार राऊतांनी संसदेत केले गंभीर आरोप : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू बाबत संसदेत सरकारवर गंभीर आरोप केले. संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांनी 15 जानेवारी रोजी भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे असं म्हटलं होतं त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत त्यांची विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो. मी आरोप करत नाही पण हा मृत्यू रहस्यपूर्ण आहे. अजित पवार फाईल कायम सोबत घेवून फिरत असत. जेव्हा ते मुंबईहून बारामतीला निघाले तेंव्हा ही ती फाईल त्यांच्याजवळ होती आणि आर्ध्यातासात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचा तपास होणे अवश्यक आहे. तपास असा व्हावा स्वतंत्र न्यायसमिती मार्फत चौकशी करुन तपास करण्याची मागणीही त्यांनी यावेळी संसदेत केली. त्याचबरोबर खासदार राऊत यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.



Comments