सुनेत्रा पवार यांच्या भोवती ‘गिधाडांचा’ गराडा वाढू शकतो, नवी ‘ढेकणं’ खूप रक्त पितात; त्यांना काटेरी रस्त्यावरून जावे लागणार आहे- जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read

जालना: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, आता अजित दादांच्या आसपासही दिसत नव्हती, ते त्यांच्या भोवती ‘गिधाडांचा’ घेराव वाढत आहे त्यांनी अतिशय जपून पावलं टाकावीत, जास्त नाहीत ते दोनचार आहेत असा खळबळजन इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना सावध केले आहे ते म्हणाले की, “दादा हे दादा होते, पण आता दादांच्या जाण्यानंतर काही नवीनच ‘ गिधाडं’ त्यांच्या भोवती घिरट्या घालू लागली आहेत. ही नवी ‘ ढेकणं’ खूप रक्त पिऊ शकतात आणि घात करू शकतात. जास्त नाहीत ते दोन-चार आहेत, सुनेत्रा वहिणींनी या ढेकणांवर लक्ष ठेवावं.”
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी या कठीण काळात पवार कुटुंबाला सोबत घ्यावे, “संकटकाळी शेवटी कुटुंबच कामाला येतं, पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकसंघ झाले तरच राज्यात मोठी मुसंडी मारता येईल. सुनेत्रा पवारांना आता अत्यंत काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे,” असंही जरांगे पाटील म्हणाले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला पाळावा असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
धनंजय मुंडेवर टीका आणि ‘घातपात’ चौकशीची मागणी
“ हे कुठेही पळतं, त्याला काही मिळत नाही. अजित पवार एवढेच फडणवीस हुशार आहेत, ते याला जवळ करणार नाहीत, आतापर्यंत यांचं दुखत होतं. पण यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.” अशी टीका त्यांनी धनंजय मुंडेवर केली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल ‘ घातपात ’ असेल तर चौकशी होईलच, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांना आता काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार असल्याचंंही पाटील यावेळी म्हणाले.



Comments