आभाळाएवढं दु:ख बाजूला सारुन, शरद पवार ‘अॅक्शन मोड’ मध्ये ग्रामस्थ,शेतकर्यांच्या मागणीला प्राधान्य; नीरा नदीच्या प्रदुषणाची केली पाहणी
- Navnath Yewale
- 4 days ago
- 1 min read

बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. गुरुवारी शासकीय इतमामात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठाणच्या मैदानावर नजर जाईल तिथपर्यंत दादांचे चाहते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी गर्दी केली होती आणि अजित दादा अमर रहे अशा घोषणा देत होते. ज्या दिवशी अपघात झाला त्यादिवशी पवार कुटुंबावर दु:खाचे मोठे आभाळच कोसळले होते. तर शरद पवार यांना माध्यमांशी बोलताना कंठ दाटून आला होता आणि शब्दही फुटत नव्हते.
आज तेच शरद पवार डोंगरा एवढे दु:ख बाजूला ठेवून बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. बारामतीतून वाहणार्या नीरा नदीच्या प्रदुषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे थेट नदीच्या काठी पोहोचले आणि दूषित पाणी का होते आहे याची माहिती घेतली. नीरा वाघज गावातून जाणारी नीरा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने ग्रामस्थांकडून याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत शरद पवार हे नीरा वाघज येथील नीरा नदी पुलावर काही काळ थांबून परिस्थितीरची पाहणी केली. नदीतील दूषित पाणी, त्याचे स्त्रोत आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती त्यांना प्रत्यक्ष दाखवली.



Comments