मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही- मंत्री जयकुमार गोरे

धाराशिव : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होता आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मंत्री विजय कुमार गोरेयांनी लाडक्या बहीणींना मोठा दिलासा देणारे विधान केले आहे.
जयकुमार गोरे धाराशिवच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलतारा गोरे यांनी म्हटले की, ‘ सरकारच्या तिजोरीवर लाडक्या बहीणींचा आणि शेतकर्यांच्या कर्जमाफीचा बोजा असला तरी राज्य सरकार सक्षम आहे. राज्याच्या विकासाला पैसा कमी पडणार नाही. आगामी काळात कुठल्याही निधीमध्ये कपात केली जाणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेले आहेत.
महायुती सरकारने लाडक्या बहीणींना मिळणारा लाभ वाढवून 2100 रुपयांपर्यंत केला जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे. यावर बोलताना तटकरे यांनी सांगितले की, ‘ लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली जात आहे. या योजनेचा हप्ता जास्त वाटवायवचा का? या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील.’



Comments