top of page

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकं मुंबईत दाखल फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली दौर्‍याला यश; 11 ऑक्टोबर पर्यंत पथकं करणार दुष्काळाची पाहणी

59 minutes ago
2 min read

मुंबई : गेल्यावर्षी ओल्या दुष्काळाचा तडाखा सहन केल्यानंतर यंदा राज्यावर कोरड्या दुष्काळाचं संकट ओढावलं आहे. त्यातही मराठवाडा, विदर्भासह राज्यासह अनेक जिल्ह्यांत पाऊस अत्यल्प झाल्यानं दुष्काळाचा फटका सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत अनुक्रमे गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच राज्यातील भीषण दुष्काळाचं वास्तव दोन्ही नेत्यांसमोर मांडत मदतीसाठी साद घातली होती.


महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी केंद्राचं पथक मुंबईत दाखल झालं आहे. प्रत्येकी 11 सदस्यांचे हे तीन पथकं आहेत. 11 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्यवा पद्धतीनं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा तीन विभागातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी पथकांकडून केली जाणार आहे.


महाराष्ट्रात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकार्‍यांसमवेत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महत्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज संपन्न झाली. या 33 जणांच्या पथकांना संबंधति बैठकीत राज्यातील दुष्काळ परिस्थितीची माहिती देण्यात आली.


छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी एक पथक, अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी दुसरं आणि विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि नजीकच्या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. या पाहणी दौर्‍यानंतर केंद्रीय पथक या दुष्काळाची भीषण तीव्रता दिल्ली दरबारी मांडणार आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.7) नवी दिल्ली येेथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दोन दिवसीय दिल्ली दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याती गंभीर दुष्काळी परिस्थितीवर अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. तसेच केंद्राकडून विशेष मदतीची मागणीही केली होती.


तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 ऑक्टोबर रेाजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रात उद्भवलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीवर या बैठकीत सुमारे एक तास चर्चा झाली. राज्य सरकारने 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये (सुमारे 74 %. दुष्काळ जाहिर केला आहेे.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना पूर्ण मदत करण्याचे आणि लवकरच केंद्रीय पथक पाहणीसाठी पाठवण्याचे अश्वासन दिल्याची माहिती सांगितली होती. तसेच शेतकर्‍यांची दिवाळी उदास जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या.

Comments


bottom of page