अभिनयाचा ‘नटसम्राट’ काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांचे निधन गोव्यातील निवासस्थानी ह्रदयविकाराचा धक्का; देशभरातील चाहते शोकाकुल, पुण्यातील डोनजेमध्ये शासकीय इतमामत अंत्यसंस्कार

चित्रपटसृष्टीतील नटसम्राट, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे 5 वाजून 20 मिनिटाने निधन झाले. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांची प्राणज्योत मालवली. नाना पाटेकर यांच्या पार्थीवावर पुण्यातील डोनजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील नटसम्राटाची अचानक एक्झीट काळजाला चटका लावणारी ठरली असून नाना पाटेकर यांच्या मृत्यूची बातमीने देशभरातील त्यांच्या चाहत्यातून शोक व्यक्त केला जात आहे.
नाना पाटेकर यांना मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकिय पथकही निवासस्थानी दाखल झाले.
वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र डॉक्टरांनी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
नाना पाटेकर यांच्या मृत्यूची बातमी कळताच ज्येष्ठ नेते शरद पवार गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल झाले. शरद पवार यांनी रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा करून नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहील श्रद्धांजली: “ अतिशय मोजक्या अभिनेत्यांमध्ये अशी तीव्रता, अनोखे व्यक्तिम्तव आणि अजोड स्क्रीन प्रेझेन्स असतो, जो नाना पाटेकर यांच्याकडे होता. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत अष्टपैलूत्व आणि सर्जनशीलता आणली आणि आपल्याला अशी अजरामर पात्रे दिली जी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील. ते त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठी ओळखले जात होते. आपल्या तत्वांसाठी उभे राहताना आणि स्वत:च्या मतांवर ठाम राहताना त्यांनी कधीही आढेवेढे घेतले नाहीत.” ‘ हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर यांचे योगदान अथांग होते. त्यांच्या जाण्यानपे कलाविश्वात कधीही न भरून निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, मित्राच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे . ओम शांती’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान- राष्ट्रपती: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अत्यंत तीव्र दु:ख झाले आहे. आपल्या ताकदीच्या आणि मनाला भिडणार्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मानवची अनुभूतींचे विविध पैलू पडद्यावर जिवंत केले त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी लोकांच्या मनावर आणि मेंदूवर एक न मिटणारी छाप सोडली. सामाजिक सेवेप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीतून वंचित आणि उपेक्षित घटकांबद्दलची त्यांची तळमळ दिसून येत असे. त्यांचे जाणे हे भारतीय चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात सहभागी असून त्यांच्याप्रती आपल्या भावपूर्ण संवेदना व्यक्त करत
राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली.
नितीन गडकरींकडून श्रद्धांजली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “ भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रिपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘ नाम फाऊंडशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा अधार बनला. नाना एक उत्तम कलाकार- अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो, ओम शांती
नाना पाटेकर यांचा अल्पपरिचय : 1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकर यांचं पूर्ण नाव विश्वनाथ गजानन पाटेकर असं होतं. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये ते नाना पाटेकर नावाने परिचित झाले होते. नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून सुरुवात केल्यानंतर ‘ गमन’ (1978) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘ परिंदा’ (1989) साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि ‘ क्रांतिवीर’ (1994) चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी ‘ आग्नी साक्षी’ , खामोशी , द म्युझिकल, ‘ अब तक छप्पन’ , ‘ अपहरण’, राजनिती, वेलकम आणि मराठी चित्रपट ‘ नटसम्राट’ यांसह अनेक चित्रपटामध्ये कौतुकास्पद भूमिका केल्या. ते एक दिग्दर्शक, लेखक आणि 2013 चे ‘ पद्मश्री’ पुरस्कार विजेते देखील होते.
पाटेकर यांनी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘ वेलकम’ (2007) या विनोदी चित्रपटात आपल्या अभिनयाची एक वेगळीच बाजू दाखवली. ज्यामधील त्यांनी साकारलेली गँगस्टर ‘ उदय शेट्टी’ ची भूमिका त्यांच्या सर्वात लक्षात राहिलेल्या कामगिरीपैकी एक बनली. ‘ वेलकम बॅक’ मध्येही त्यांनी ही भूमिका पुन्हा साकारली. मराठी चित्रपटसृष्टीत, पाटेकर यांनी ‘ नटसम्राट’ (2016) चित्रपटात एका निवृत्त रंगभूमी नटाची भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीतील एक सर्वोत्तम अभिनय सादर केला. त्यांनी ‘ डॉ. प्रकाश बाबा आमटे -द रिअल हिरो ’ या चित्रपटातही भूमिका केली, यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) मिळाला.
ते एक दिग्दर्शकही होते: त्यांनी 1991 मध्ये ‘ प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच या चित्रपटात अभिनय आणि त्याचे लेखनही त्यांनी केले होते. पाटेकर यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि ते तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी होते.
नाना पाटेकर यांना मिळालेले पुरस्कार: नाना पाटेकर यांना त्यांच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच क्रांतिवीर चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच परिंदा आणि अग्निसाक्षी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय नाना पाटेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
नामा फाऊंडेशनच्या माध्यमातनू सामाजिक कार्य: नाना पाटेकर यांनी अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रामध्येही आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी सामाजिक कार्य सुरू केले होते. नाना पाटेकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह 2015 साली नाम फाऊंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना आर्थिक मदत करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करणे, बंधारे निर्मिती, जलसंधारणाची कामे यामध्ये त्यांचं मोठ काम आणि योगदान आहे.



Comments