top of page

अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू, केंद्रीय संस्थेने घेतले सूत्र हाती

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौेकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघातीची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली.


विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरू केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.


अजित पवार यांच्यासारख्या अतिशय विरष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी 4 जणांना यात प्राण गमवावे लागले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत, यादृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशीही पत्रातून मागणी केली होती.

Comments


bottom of page