top of page

स्वयंघोषीत ज्योतिष कॅप्टन खरातचा संतापजनक कारणामा नाशिकमधील कॅनडा कॉर्नरच्या आफिसमध्ये महिलांसोबत करायचा चाळे आणि संतापजनक कृत्य

नाशिक: नाशिकमध्ये स्वत:ला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखणार्‍या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर अरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राईम ब्रँचने बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या विकृत प्रकारांची धक्कादायक महिती समोर आली आहे. खरातचा विकृतपणा एकून तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. कथित ज्योतिषी त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलावून त्यांचं लैंगिक शोषण करायचा.


अशोक खरात नाकिशमधील कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये महिलांना बोलवायचा. भविष्य सांगण्याच्या नावाखाली त्या भक्तांशी वेडेचाळे करत होता. काळ्या काचांच्या ऑफिसमध्ये तो महिलांशी अश्लील कृत्य करायचा. कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये तो महिलांना ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं बोलवत स्वत: लघुशंका करून तो महिलांना लघवी प्यायला देत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:ला ज्योतिष म्हणणार्‍या भोंदू बाबा खरातचा भांडाफोड झाला आहे. खरातची काळी कृत्य उघड झाल्यानंतर आता आणखी काही तक्रारदार महिला समोर येण्याची शक्यता आहे.


दरम्यान, खरातनं गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडिओही पोलिस तपासात उघडकीस आले आहेत. सिन्नर तालुक्यात आशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे.


या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरदेखील आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे.

Comments


bottom of page