गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचा;नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक , पोलिसांना सापडले 58 व्हिडिओ, नामांकित महिला, सेलिब्रिटी, अधिकार्यांचा समावेश
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read

नाशिक : एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने बुधवारी(दि.18) पहाटे अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाला अटक केली. अशोक खरात हा नावाजलेला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट आि कंशास्त्रज्ञ होता. अनेक बडे राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटी अशोक खरात याच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. त्यामुळे अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. अशोक खरात याच्या विरुद्ध आतापर्यंत एकाच महिलेने तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अशोक खरात आणि राजकारण्यांचे लागेबांधे असल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
या सर्व प्रकरणांबाबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अशोक खरात याची अटक हा फक्त एक गुन्हा नाही, तर एक मोठ्या शोषणाच्या रॅकेटचा पर्दाफाश आहे. स्वत:ला “ कॅप्टन” म्हणवणारा आणि राजकीय वर्तुळांमध्ये ज्योतिष म्हणून वावरणार्या या व्यक्तीला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना 58 अश्लील व्हिडिओ सापडले असून, त्यामध्ये अनेक महिलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे, ज्यात प्रभावशाली वर्तुळांतील महिलांचाही समावेश आहे.
वर्षानुवर्षे त्याने ज्योतिषाच्या माध्यमातून राजकारणी, सेलिब्रिटी आणि उच्चभू्र लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली. बाहेरुन विश्वासहर्तेचा आव आणत, बंद दारांआड महिलांचे शोषण केले. सत्तेच्या जवळीकमुळे आंधळा विश्वास निर्माण होतो. त्यामुळे यंत्रणा मूक होऊन अत्याचाराला खतपाणी मिळते. आता प्रश्न हा नाही की खरात कोण आहे, तर खरा प्रश्न आहे, त्याला संरक्षण कोणी दिले? आणि त्या व्हिडिओंमध्ये अजून कोण आहे? असा सवाल विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार सयंज राऊत यांनी विजय कुंभार यांच्या पोस्टचा दाखला देत ‘महाराष्ट्र की एपस्टिन फाईल खुल गई’ अशी खोचक टिप्पणी केली आहे.
दरम्यान, नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्राईम ब्रांच युनिट एक कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेने अशोक खरात याच्याविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार दिली आहे. त्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. संशयिताचे “ अशोक खरात ” नाव असून सध्या एकाच महिलेची तक्रार दाखल आहे. तक्रारीनुसार महिलेवर अत्याचार झाल्या झाल्याचे समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक (गुन्हे शाखा एक) अंचल मुदगल यांनी दिली आहे.



Comments