कुवख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा पैलवान सागर मोहळकरचा मृत्यू ,जामखेडमध्ये गोळीबाराच्या घटनेत गंंभीर जखमी; ससूनमध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली
- Navnath Yewale
- Mar 17
- 1 min read

जामखेड: जामखेड (जि. आहिल्यानगर) शहराला हदरवणार्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुड सागर मोहळकर याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचरादम्यान सोमवारी (दि.16) मृत्यू झाला आहे. सुसून रुग्णालयात गेल्या बारा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने सायंकाळी त्याची प्राणज्योत मालावली. या घटनमुळे जामखेड परिसरात खळबळ उडाली आहे.
पैलवान सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून पैलवान सागर मोहळकर चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने घटनेचा तपास सुरू केला होता.
सागर किसण मोहळकर याच्यावर जामखेड शहरात नुरानी कॉलनी परिसरात बुधवारी (दि.4) रात्री दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात सागर मोहळकर गंभीर जखमी झाला होता. गोळीबारच्या घटनेमुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिस घटनास्थळी दाख झाले. पोलिसांनी सागर मोहळकरला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. या हल्ल्यात आरोपींकडून सागर मोहळकर याच्यावर एकून सात राऊंड फायर करण्यात आले पैकी चार गोळ्या मोहळकर याच्या शरिरात घुसल्या होत्या. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने अखेर सागर मोहळकरने सोमवारी दि.16 सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.
स्थानिक पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू केला होता , या प्रकरणाचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत जाऊन पोहचले. स्थानिक पोलिसांनी मुख्य आरोपी अभिमन्यू पोते यासह दोघांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या पूर्ण नाव मिळू शकले नाही या आरोपींनी मिळून गोळीबार केल्याची माहिती समोर आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या गोळीबारामागे गुंड निलेश घायवळ याचे काही कनेक्शन आहे का याबाबत आता पोलिस तापास करत आहेत.



Comments