अभिनेता टायगर श्रॉफ वरील हल्ला प्रकरण: पोलिसांची 15 पथकं हल्लेखोरांच्या मागावरएक संशयित पोलिसांच्या ताब्यात; कुख्यात गुन्हेगारी टोळीने स्वीकारली जबाबदारी?

मुंबई: मुंबईत सध्या नवरात्री आणि गरब्याची लगबग आहे. सनासुदीचा कालावधी रस्त्यांवर गर्दी असे चित्र असतानाच रविवारी रात्री 7:00वाजेच्या सुमारास अतिशय धक्कादायक घटना घडली. जुहू परिसरात तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी ज्येष्ठ अभिनेते जामी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. या घटनेने परिसरता एकच खळबळ आणि धावपळ उडाली ,तरीली त्याचा ड्रायव्हर आणि एक फॅन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांना जखमी अवस्थेत तातडीने उपचारार्थ कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टायगर श्रॉफ जुहू परिसरातील पुष्पा नर्सिंग पार्क भागात नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. खेळ आटोपून सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारस तो मैदानाबाहेर पडला. त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी काही चाहत्यांनी त्याच्या गाडीभोवती गर्दी केली होती. त्याच वेळी अचानक बाईकवरून आलेल्या तिघांनी वाहनाच्या दिशेने थेट गोळीबार सुरू केला. अवघ्या कही सेकंदांत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या बेछूट गोळीबारात टायगर श्रॉफ ड्रायव्हर आणि फोटोसाठी पुढे आलेला एक चाहता जखमी झाले आहेत. टायगर श्रॉफ पूर्णपणे सुरक्षित असून त्याला कोणतीही इजा झालेले नाही. यावेळी टायगरने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न लावता स्टेअरिंग हातात घेऊन दवाखाना गाठला. त्याने ड्रायव्हरला तातडीने कूपर रुग्णालयात उपचारासाठी हलवले. सध्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका कुख्यात गुन्हेगारी टोळीने या घटनेची जबाबदारी घेतल्याचे वृत्त समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
ही घटना समोर येताच वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. एका व्हिडिओमध्ये हल्ला होण्याआधी टायगर फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. यावेळी त्याने त्याच्या चाहत्यासोबत सेल्फीही काढले, त्याने प्रत्येकाशी हसून संवादही साधला. मात्र
अगदी काही वेळातच त्याच्यावर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला होईल याचा विचारही कोणी केला नव्हता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली; एक संशयित ताब्यात : घटनेचे गांभीर्य राखून मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. हल्लेखोरांच्या मागावर पोलिसांची 15 पथकं रवाना झाली आहेत. तसेच पोलिस घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासत आहेत. हल्लेखोर कोणत्या दिशेने आले आणि गोळीबारानंतर त्यांनी पळ काढण्यासाठी कोणता मार्ग निवडला, याचा मागोवा घेतला जात आहे. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जुहू पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाईचे अश्वासन दिले आहे.



Comments