उद्घटनाच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींवर हल्ला, पश्चिम बंगालाच्या राजकीय क्षेत्रात खळबळ साडी ओढणार्या तरुणीकडे सापडला चाकू - तृणमूल काँग्रेसचा दावा

कलकत्ता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृनमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. कालीघाटीमध्ये दुर्गा पूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी निघालेल्यवा ममता बॅनर्जी यांच्यावर एका तरुणीनं हल्ल्याचा प्रयत्न केलच्या आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तरुणीने ममता बॅनर्जी यांची साडी ओढली, तिच्याकडे एक चाकू देखील सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर स्थानिक तृणमूल काँग्रेस नेतृत्वानं माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. पश्चिम बंगाला विधानसभा निवडणुकीत तृनमूल काँग्रेसचा पराभव झाला. राज्यात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली. सत्तांतर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्यानं हल्ले होत आहेत. आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांनाही याचा सामाना करावा लागत आहे.
दरम्यान, याआधी 4 मे रोजी दक्षिण 24 परगण्यात ममता बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. निवडणुक निकालानंतर काही दिवसांनी हा प्रकार घडला होता. सोनपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात एका गटानं चोर है अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी अभिषेक बॅनर्जी यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला. एका गटानं त्यांच्यावर दगड चपला फेकल्या. तृणमूल काँग्रेसने स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ल्याचे आरोप केले होते.
यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरही अंडी फेकण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या. अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर कुणाल घोष यांनाही याचा सामाना करावा लागला. त्यांच्यावर एका तरुणानं अंडी फेकली. कुणाल घोष कालीघाट परिसरात ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली. तेव्हा एक अंडं कुणाल घोष यांच्या डोक्यावर लागलं होतं.
सप्टेंबर 2026 मध्ये हुगळीच्या उत्तरपाडा परिसरात ममता बॅनर्जी यांच्या एका रॅलीत सहभागी होण्यासाठी कुणाल घोष निघाले होते. तेव्हा काही जणांनी त्यांच्या कारला घेराव घातला. कारवर अंडी आणि दगड फेकण्यात आले. त्यामुळे कारची काच फुटली. राज्यातील सत्ता गमावल्यापासून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हल्ल्याचा प्रयत्न करणार्या तरुणीकडे एक चाकू मिळाल्याचा दावाही तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.



Comments