top of page

जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यास ‘होम’ पिचवरच विरोध ! ..तर जसाश तसे उत्तर देऊ, शिंदेसेनेचा इशारा

7 hours ago
2 min read

बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधकांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असतानाच आता ‘होम पीच’वरच विरोध होत आहे असल्याचे समोर आले आहे. श्री क्षेत्र नाराणगड येथे आयोजीत दसरा मेळाव्यावरून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिाकारी आक्रमक झाले असून जरांगे पाटल यांना थेट इशारा दिला आहे.


मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर गंभीर आरोप करत त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी त्यांचे जुने सहकारी अमोल खुने यांच्याकडून करण्यात येत आहे. आंतरवाली सराटी येथील आंदोलनाचे व्यासपीट, मंडप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून ललिता तारख यांनी थेट जरांगे पाटील यांना प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील व त्यांच्या सहाकर्‍यांवर सातत्याने गंभीर आरोप करणारे अमोल खुने यांच्यावर बीडच्या पाली येथील नगेश्वर मंदीरात हल्ल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नारायगडावरील दसरा मेळाव्यासाठी येणार असल्याचे जाहीर केल्यामुळेच आपल्यावर जरांगे पाटील यांनी हल्ला घडवून अणल्याचा आरोप अमोल खुने यांनी केला आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी अमोल खुने यांचे आरोप फेटाळून लावले असून दसरा मेळाव्यात आपलीच लोकं फोडून आपल्या अंगावर घालून गोंधळ निर्माण करण्याचं षडयंत्र रचल्याजात असल्याचा दावा केला. अमोल खुने यांच्या विरोधानंतर आता नारायणगडावरील दसरा मेळाव्यावरून शिंदे सेनेचे जिल्हा पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर यांनी दुष्काळामुळे नारायण गडावरील दसरा मेळावा रद्द करण्यात यावा, जरांगे पाटील यांनी नारायगडावरून राजकीय भाष्य करू नये, खास करून राजकारण्यांच्या विरोधात वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही.


शिवसेना (शिंदे) प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलल्यास जरांगे पाटलांस जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही दिला आहे. आंदोलन करून राजकारण्यांकडे मागण्या मागता, मग राजकारणी चुकले तर आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यांनी आम्हाला सांगायला हवं आमच्या नेत्यांवर बोललेलं खपवून घेणार नसल्याचा इशाराही स्वप्नील गलधर म्हणाले.

विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या बीड दौरा असो किंवा बीड जिल्हा सकल मराठा समाजाचा कार्यक्रम असो स्वप्नील गलधर हे फ्रंटलाईनचे कार्यकर्ते, जरांगे पाटील यांच्या स्वागतापासून सर्व बहुतांश समाजकार्यात अग्रेसर असलेले स्वप्नील गलधर यांनीच जरांगे पाटील यांना इशारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुष्काळाच्या सावटात नारायणगडावर होऊ घातलेला दसरा मेळावा की, जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली जाणारी टिका हेच या विरोधामागील कारण आहे का? हे येणार्‍या काळात समोर येणार आहे. मात्र, जरांगे पाटील समर्थकांकडून नारायणगडावरील दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु असतानाच स्वप्नील गलधर यांच्या रुपाने जरांगे पाटील यांना सध्यातरी ‘होम पिच’वरच विरोधाला सामोरं जावं लगत आहे.

Comments


bottom of page