top of page

अमोल खुने हल्ला प्रकरण वेगळ्या वळणावर; मौजवाडी ग्रामस्थांची पोलिस अधिक्षकांकडे धाव!

5 hours ago
3 min read

टि-शर्ट वरील लोगो, आमोल खुनेंकडून शिवीगाळ, तपासी अधिकार्‍याची गंंभीर गुन्हे दाखल करण्याची घाई, संतप्त ग्रामस्थांचे सवाल


बीड: अमोल खुने यांच्यावर मागील आठवड्यात बीडच्या पाली जवळील नागेश्वर मंदीरात हल्ल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यात आमेल खुने यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल खुने यांच्या फिर्यादीवरू बीड पोलिसांनी आरोपींच्या विरेधात गंभीर गुन्हे दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र,तपासी अधिकार्‍याने प्रकरणाची शहानिशा न करता, मेडीकल रिपोर्टच्या आधाराशिवाय गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत मौजवाडी ग्रामस्थांनी न्यायासाठी पोलिस अधिक्षकांकडे धाव घेतल्याने अमोल खुने हल्ला प्रकरण आता वेगळ्या वळणावर आले आहे.


जरांगे पाटील यांचे जुने सहकारी व अलिकडच्या काळात जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर गंभीर आरोप करत त्यांची ईडीकडे तक्रार करणारे अमोल खुने यांच्यावर मागील आठवड्यात हल्ल्याची घटना समोर आली होती. नवरात्र उत्सवामुळे ग्रामीण भागातील युवकांचे जथ्थेच्या जथ्थे तुळजापूर येथून ज्योत आणण्यासाठी जातात. शनिवारी (दि.10, ऑक्टोबर) अमोल खुने सहकार्‍यांसमवेत लाला रंगाच्या स्कॉर्पिओमधून बीड जवळील पाली शिवारातील नागेश्वर मंदीरात देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात 50 ते 100 हल्लेखोरांनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवल्याची माहिती अमोल खुने यांनी दिली.


अमोल खुने यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बाळराजे दराडे यांनी अज्ञात आरोपींच्या विरोध 307 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी तीन आरोपींना अवघ्या दुसर्‍या दिवशीच पोलिसांनी अटक केली. मात्र, मौजवडी ग्रामस्थांच्या धक्कादायक खुलासा, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ, संतप्त ग्रामस्थांचे आरोप, तपासी अधिकार्‍यांवर ग्रामस्थांचा संशय आणि पोलिस अधिक्षकांकडे प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशीची मागणीमुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर आल्याचे चित्र आहे.


मौजवाडी ग्रामस्थांनी आज (बुधवार, दि.14) न्यायसाठी पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांच्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी माध्यमांशी संवाद साधत त्या घटनेची माहिती देताना बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक तथा तपासी अधिकारी बाळाराजे दराडे यांच्या कर्तव्यावर संशय व्यक्त केला. ग्रामस्थांच्या दाव्यानुसार मौजवाडी येथील युवक तुळजापूर येथून ज्योत घेवून गावकडे येत असताना पाली शिवारातील मंदिराजवळ दारूच्या नशेत धुत्त असलेले अमोल खुने व त्यांच्या सहाकर्‍यांनी ज्योज घेवून चालणार्‍या देवीभक्तास जोराचा धक्का दिला. ज्यामुळे ज्योतीमधील गरम तेलामुळे देवीभक्ताच्या उजव्या हताचा खांदा भाजला. या प्रकारानंतर अमोल खुने व त्याचे सहकारी नागेश्वर मंदिराजवळ स्कार्पिओ लावून दारू पित होते.


ज्योतीसोबत असलेल्या युवकांनी अमोल खुने व त्यांच्या सहकार्‍यांना ज्योत घेवून चालणार्‍या भक्तास धक्का का दिला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता अमोल खुने व त्याच्या सहकार्‍यांनी देवीभक्तांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला.


शिवाय जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांनी अमोल खुने यांच्या स्कार्पिओमधील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमोल खुने पुढच्या सिटवर बसलेला अवस्थेत आहे मधल्या शिवटवर दारूच्या बाटल्या आहे, शिवाय गाडीच्या मागील बाजूसही दारूच्या बाटल्या, (चकना)खाद्य पदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या दिसून येत आहे. व्हिडिओ काढणारी व्यक्ती शिव्या का देता असं जोरजोरात ओडून जाब विचारताना दिसून येत आहे.


दरम्यान, अमोल खुने आणि त्याच्या सहकार्‍यांनी ज्योज घेवून येणार्‍या देवीभक्तास धक्का देण्याचे कारण देवीभक्तांच्या टि-शर्टवर मनोज जरांगे यांचे चित्र(लोगो) छापलेले होते. जरांगे पाटील यांचे चित्र पाहून दारुच्या नशेत धुत्त खुने आणि त्याच्या सहकार्‍यांनी ज्योत घेवून धावणार्‍या देवीभक्तास धक्का दिला. ज्यामुळे देवी भक्ताच्या उजव्या हताच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी त्या भक्तालाही माध्यमांसमोर हजर करत खांद्याची जखम दाखवली. शिवाय अमोल खुने व त्याचे सहकारी नागेश्वर मंदिरासमोर दारू पित होते असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


अमोल खुने आणि तपासी अधिकार्‍यांचा सीडीआर काढा : दरम्यान अमोल खुने यांच्या जबाबावरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळाराजे दराडे यांनी 307 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्याची एवढी घाई कशासाठी केली. या घटनेची दूसरी बाजू समोर येण्यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल करण्यामागचा हेतू काय? ज्योत आणण्यासाठी गेलेले सर्व तरूण पोलिस भरती, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे आहेत. तपासी आधिकारी बाळराजे दराडे यांनी मागील काळात हदवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावरही अशाच प्रकारचा खोटा 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता असा अरोप करत ग्रामस्थांनी तपासी अधिकारी दराडे यांच्या कर्तव्यावर संशय व्यक्त करत अमोल खुने आणि तपासी अधिकारी बाळराजे दराडे यांच्यातील सीडीआर काढण्याची मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.

Comments


bottom of page