top of page

पुरावे गोळा करून ठेवा मोदी, शाह, ज्ञानेशकुमारसह पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांना सोडणार नाही - राहुल गांधी

1 hour ago
2 min read

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 14 ऑक्टोबर रोकजी नवी दिल्लीत 10 जनपथ येथे पत्रकार पिरषदेत आंदोलक विद्यार्थ्यांना सोबत घेवून हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना थेट इशारा दिला. मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि मतदार यादीतील एसआयआर प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदेालन करणार्‍या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमिवर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली.


मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघातील टीका करत, “ ज्ञानेश कुमारांना वाचवण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार पूर्णपणे उघडे पडत आहे ” असा थेट आरेाप केला.


दिल्लीतील विविध भागात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू असून रेल्वे स्थानके आणि वाहनांमधून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘ तुम्ही आणखी पोलिस तैनात करा, आम्हाला हेच हवे आहे, लोकांना स्पष्टपणे दिसतेय की केंद्र सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे. जेवढे ज्ञानेश कुमारांना वाचवले जाईल, तेवढे हे सरकार उघडे पडेल. त्यांना वाचवण्याच्या या प्रयत्नात आम्ही ज्ञानेश कुमारांना नियंत्रित करणार्‍या मूळ लोकांपर्यंत पाहोचणार आहोत, हीच आमची रणनीती असल्याचे राहुल गांधी म्हणाले.


राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, “ खुद्द पोलीस कर्मचार्‍यांमध्येही आज चर्चा सुरू आहे की आपण विद्यार्थ्यांना आणि तरुणांना का मारहाण करत आहोत? आपण ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी का ताकद पणाला लावत आहोत? देशातील कोट्यवधी तरुण लोकशाही वाचवण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत.”


सनन्यायाधीशांच्या भेटीबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ आम्ही मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र, त्यांनी नियमानुसारप याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. आता आम्ही ‘ इंडिया’ आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अधिकृत याचिका दाखल करणार आहोत.”


त्याचबरोबर राहुल गांधी यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना राहुल गांधी यांनी दीर्घकालीन संघर्षाचा नारा दिला. “ आपले हे आंदोलन सलग सुरूच राहणार आहे. यासाठी जितके दिवस, महिने किंवा वर्षे लागतील, तेवढा काळ आपण लढू, देश असाच दीर्घकालीन संघर्षातून उभा राहतो, एक- दोन दिवसांत देश घडत नाही,” असा विश्वासही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला. मी आंदोलकांना पुरावे गोळा करुन आमच्याकडे देण्याचे आवाहन केले आहे. ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याच्या नादात युवकांवर लाठीचार्ज करणार्‍या मोदी असो, शाह असो, ज्ञानेश कुमार असो किंवा पोलिस अधिकारी कर्मचारी असो सगळ्यांवर कारवाई होणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी आंदोलनमाध्ये पोलिसांच्या लाठीचार्जने प्रभावीत विद्यार्थी, विद्यार्थीणींनी पोलिसांनी डिटेन केल्याचा अनुभव सांगत दिल्ली पोलिसांवर मारहाणीचे आरोप केले.

Comments


bottom of page