top of page

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणार्‍या तिघांना राजस्थानच्या कोटामधून अटक राजस्थान पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांना मोठं यश

7 hours ago
2 min read

मुंबई : अभिनेता टायगर श्रॅाफ यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातीलतीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कोटा येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून गेले होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडून केला जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ यांच्यावर रविवारी संध्याकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी या वेळी 5 ते 6 राऊंड फायर केले. यास घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गोळीबारीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी अंधेरी पश्चिम येथे स्थानकाजवळ आढळून आली. या दुचाकीच्या आधारे आणि इतर माहितीच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.


तपासादरम्यान आरोपी सुरतच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर ते पुणे-जयपूर एक्सप्रेसने पुढील प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिस आरोपींच्या मागावर होते. आरोपी सुरतहून राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला. आरोपींबाबतची माहिती कोटा पोलिसांना देण्यात आली. तयनंतर कोटा पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांचे पथकही कोटा येथे पोहोचले असून, आरोपींना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.


या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीपैकी एक जण बिहारमधील, तर दोघे हारियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीपैकी दोघांचे बारावीपर्यंत, तर एकाचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे वयही कमी असल्याचे समोर आले आहे. दोन आरोपी 18 वर्षाचे, तर तिसरा आरोपी 22 वर्षाचा आहे. या आरोपींनी टायगर श्रॉफ यांच्या घराची अनेकदा रेकी केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. त्यामुळे हा गोळीबार पूर्वनियोजित होता का आणि त्यामागे नेकमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपिंविरोधात हत्येच्या कटासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारामागील उद्देश काय होता, आरोपींना कोणी सूचना दिल्या होत्या का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. टायगर श्रॉफ यांच्या घराची वारंवार का करण्यात आली, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात खंडणीचा काही संबंध आहे का, यासह विविध शक्यतांचा तपास यंत्रणा तपास करत आहेत.


गोळीबार केल्यानंतर आरोपींनी मुंबईतून नेपाळला पळून जाण्याच्या योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्यांचा माग काढत राजस्थानमधील कोटा येथे त्यांना अटक केली. आता आरोपींना मुंबईत आणल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत गोळीबाराचा कट कसा रचण्यात आला, हल्ल्यासाठी कोणती शस्त्रे वापरण्यात आली आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page