मनोज जरांगे विरोधात पुरवाव्याचा दावा; अजय बारस्करांनी अंबड पोलिसांकडे पेनड्राईव्ह सोपवला

महिलांना लज्जा येईल, अशा अश्लिल भाषेचा आरोप; जरांगे मराठा मुलांना फाशी घेण्यास प्रवृत्त करतात - अजय बारस्कर

मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणार्‍यां पैकी एक मानले जाणारे अजय महाराज बारस्कर यांनी आज जालन्याच्या अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाणे गाठले. जालन्याच्या महिला जिल्हाधिकार्‍यांना अश्लिल शब्द वापरुन महिलांना लज्जा येईल असे शब्दप्रयोग केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे विरोधात पुरवाव्याचा दावा; अजय बारस्करांनी अंबड पोलिसांकडे पेनड्राईव्ह सोपवला
Published By: Navnath Yeole
Published On:

अंबड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना अश्लिल भाषा वापरली, महिलांना लज्जा येईल असा शब्दप्रयोग केल्याचा आरोप करत अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जरांगे पाटील यांच्या विरोधात पुराव्यांचा दावा करत पेनड्राइव्ह घेवून अजय बारस्कर मंगळवारी (दि.24) अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अलिकडे केलेल्या आंदोलनकाळात जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांना अश्लिल अश्लिल शब्द वारला. उपोषणा दरम्यान जिल्हाधिकारी अशीमा मित्तल पोलिस अधिक्षकांसमवेत स्टेजवर उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी मित्तल यांनी आपणाकडे मंत्री विखे पाटील यांनी राज्यातील 58 लाख नोंदचा पेनड्राईव्ह दिल्याचे मनोज जरांगे यांना म्हणल्या. त्यावर मनोज जरांगे यांनी अशिमा मित्तल यांना अश्लिल शब्दात, उद्घट उत्तर दिले. शिवाय जरांगे पाटील म्हणाले की, भल्या भल्या मंत्र्यांना माझ्यासमोर फाशी घेण्याची वेळ येते, त्यावर अशीमा मित्तल संमोहित होवून म्हणाल्या ‘ मला कर्जव्य बजावताना फाशी घेण्याची वेळ आली तरी मी घेईल’ म्हणजेच जरांगे पाटील मराठा मुलांना फाशी घेण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोपही अजय बारस्कर यांनी केला.
 
अंबडच्या गोंदी पोलिस ठाण्यात दाखल होऊन अजय बारस्कर यांनी पोलिस प्रशासनाकडे मागणीचे निवेदन दिले, यावेळी त्यांनी पुराव्याचा दावा करत पोलिसांना पेनड्राईव्ह दिला. दरम्यान अजय बारस्कर यांनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीसांनी घटना घडलेल्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याकडे वर्ग केली. त्यानुसार जालना पोलिसांनी अजय बारस्कर यांना पुराव्यासह समक्ष हाजर होण्याच्या सुचना दिल्या होत्या. अजय बारस्कर मंगळवारी (दि.24) गोंदी पोलिस ठाण्यात समक्ष हाजर होवून मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

पोलिस ठाण्यातून बाहेर पडताच अजय बारस्कर यांनी माध्यमांशी संवाद साधत मनोज जरांग पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करणे कसे अवश्यक असल्याचे पोलिसांना सांगितल्याचंही अजय बारस्कर यावेळी म्हणाले. मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अत्यंत खालच्या दार्जाची आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे कसे गरजेचे आहे, हे पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. गोंदी पोलिस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Posts