मुंबईत गणेशोत्सवात आगमन-विसर्जनाच्या मिरवणुका जाणार 12 धोकादायक पुलांवरून

मुंबईत गणेशोत्सवात आगमन-विसर्जनाच्या मिरवणुका जाणार 12 धोकादायक पुलांवरून
Published By: Navnath Yewale
Published On:

मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 पूल धोकादायक स्वरुपाचे आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. यास्तव गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यानया पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणार्‍या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे अवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मध्ये रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आर्थर रोड रेल्वे किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भाखळा रेल्वे उड्डाणपुलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फे्रंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे उड्डाणपूल ( ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये) फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी- कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या 12 पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करून नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरून खाली उतरल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांनी जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरून पुढे जावे, पोलिस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Posts