मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा राजीनामा!

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचा आमदारकीचा  राजीनामा!
Published By: Navnath Yewale
Published On:

थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळडनाडूमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले. टीव्हीकेनं सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके यांना जबदरस्त धक्का दिला. हा धक्का एवढा मोठा होता की स्टॅलिन देखील पराभूत झाले. मात्र जरी थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बहुमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या- मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आणि रविवारी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे.

दरम्यान, थलपती विजय यांनी दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते दोन्ही जागेंवर विजयी झाले होते. थलपती विजय यांच्या पक्षाच्या आमदारांची एकूण संख्या 108 होती, मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार थलपती विजय यांनी एका मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे थलपती विजय यांच्या पक्षाकडे आता 107 च आमदार आहेत. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभेचे प्रमुख सचिव के, श्रीनिवासन यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली घेतली.

दरम्यान, आज रविवारी थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. थलपती विजय यांच्या शपविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांनी मोठी घोषणा केली आहे. आता तामिळनाडूमध्ये फक्त एकच सत्ताकेंद असणार आहे. ते म्हणजे मी स्वत: थलपती विजय यांनी मोठी घोषणा केली आहे. आता तामिळनाडूमध्ये फक्त एकच सत्ताकेंद्र असणार आहे. ते म्हणजे मी स्वत: थलपती विजय असं त्यांनी म्हटलं आहे. थलपती विजय यांची ही घोषणा सत्ताधारी मित्र पक्षांसोबतच विरोधकांना देखील इशारा मानला जात आहे. तसेच मी तामिळनाडूमध्ये काहीही चुकीच होऊ देणार नाही, तसेच चुकीचं होत असेल तर ते देखील सहन करणार नाही असंही योवेळी थलपती विजय यांनी म्हटलं आहे.

Related Posts