top of page


महायुतीतील नाराजीनाट्यावर एकनाथ शिंदेयांचा खुलासा!
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उघड-उघड नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचेही बोलले जात आहे. भाजपा आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडमुळे नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले होते. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह
Nov 251 min read


बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत...- मुख्यमंत्री फडणवीस
लाडकी बहीण, शेतकर्यांसाठीच्या योजना बंद होणार नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांचे कोपरगावात अश्वासान आहिल्यानगर /राहता : लाडकी बहिण योजना, शेतीला मोफत विज, पिक विमा, तसेच शेतकर्यांसाठी घेतलेले निर्णय सरकार कधीच बंद करणार नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडणविणारे लोक आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलताना केले. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील भाजप- रिपाई युतीच
Nov 252 min read


... तर संपूर्ण हिंदुस्थानात भाजपला हादरवून टाकेन- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरला विरोध, तृनमूल काँग्रेस रस्त्यावर भाजप माझ्याशी माझ्याच खेळात लढू शकत नाही, मला हरवू शकत नाही. जर भाजपने बंगालमध्ये माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मी सूपर्ण हिंदुस्थानात हादरवून टाकेन, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बोनगांव येथे एसआयआर विरोधी रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर अरोप केला आहे की, “निवडणूक आयोग आता निष्पक्ष संस्था राहिलेली नाही, ती भाजप आयोग बनली आह
Nov 251 min read


अजितदादांच्या बीडच्या सभेला स्टार प्रचारकाची दांडी !
परळी, धनंजय मुंडे नावं टाळले, चर्चेला उधान बीड: नगरपालिकांच्या निवडणुक प्रचारार्थ जिल्ह्यात सध्या अजित पवारांच्या प्रचारसभांची धडका सुरू आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसर्या प्रचारसभेलाही मुंडे गैरहजर होते. अजित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये परळी किंवा धनंजय मुंडे यांचा उल्लेख टाळलने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पव
Nov 251 min read


राज्यातल्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुका पुढे ढकलणार! उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य
धाराशिव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची पाच वर्षाहून अधिक काळानंतर मोठी उत्सुकता आहे. नगरपालिका, नगरपरिषद यासाठी सत्ताधारी, विरोधक सुद्धा एकत्र आल्याचे चित्र आहे. त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. पण जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याविषयीचे वक्तव्य चर्चेत आले आहे. जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित
Nov 231 min read


भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, गोपनियतेत उरकला पक्षप्रवेश
छ. संभाजीनगर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. नेते, पदाधिकार्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, यामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा सर्व पक्षातील पदाधिकार्यांचा समोवश आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्र
Nov 231 min read


उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आडचणी वाढण्याची शक्यता!
ऐन निवडणुकीत विरोधकांच्या हातात ऐतं कोलित; अंबादास दानवेंची टीका राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगरपरिष आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. एका प्रचार सभेमध्ये बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन करतान
Nov 232 min read


मनसे-उद्धवसेनेत वादाची ठिणगी; राज ठाकरेंच्या त्या 11 उमेदवारांवरून धुसपूस
शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात अंबरनाथमध्ये शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी युती करीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधकांना रोखण्यासाठी एकत्र आलेल्या युतीत निवडणुकीपूर्वीच धुसपूस सुरू झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेने विरोधात लढणार्या उबाठाच्या निष्ठावंताना डावलत त्या प्रभागात मनसेच्या उमेदवारांना प्राधान्य देत उमेदवारी दिल्यावरून उबाठा आणि मनसेतही नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत यंदा य
Nov 221 min read


शिवसेना (शिंदे)पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियक्त्या
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुमाकुळ सुरू आहे. युती, आघाडीसह पक्षप्रेवशावरून महायुतीत धूसपूस सुरू आहे. यावरून नाराज एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत भाजपच्या राज्य नेतृत्वाची तक्रार केल्याचे वृत्त असतानाच आता एकनाथ शिंदे ऍक्शनमोडवर आले आहेत. आज शिवसेना (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्याने हे सिद्ध झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये कुठे युती तर कुठे मैत्रिपूर्ण लढती होत आहेत. मा
Nov 222 min read


निवडणुकीपूर्वीच भाजपचा मोठा विजय!, 100 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष जिंकले
बीड: राज्यात कडाक्याच्या थंडीत नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईत भाजपने 100 चे टार्गेट ठेवले आहे. अशातच निवडणुकी आधीच महाराष्ट्रात भाजपने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच 100 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष जिंकले आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शतक ठाकेले आहे. निकालापूर्वी शंभर जागांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोधत निवड झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यम
Nov 221 min read


शिवसेना, मनसे आधिच एकत्र, काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णयआम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचे ट्विट
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणुक जिंकण्यासाठी सध्या वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. सत्ताधारी महायुतीचे तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र बरेच मतभेद आहेत. महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्र येणार आणि कोण वेगळी चूल मांडणार हे अद्याप समजून शकलेले नाही. काँग्रेस पक्षाने तर मनसे सोबत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार नाही. असे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय
Nov 222 min read


भाजप- शिंदेसेनेत राडा: शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, भाजपच्या माजी नगरसेवकावर आरोप
एकनाथ शिंदे आधीच नाराज, त्यातच वादाची ठिणगी ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेवून भाजप राजच्याच्या वरिष्ठ नेतृत्वाची तक्रार केल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेतील पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावरून थेट मंत्र्यांची नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून भाजपच्या नेतृत्वाबाबत तक्रार केल्याचे समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरून हा वाद निर्माण झालेला असतानाच आता ठाण्यातून या वादाला फुंकर मिळाल्याची घटना
Nov 212 min read


चूकीला माफी नाही, अनगरच्या पाटलांचा माज उतरवणार - उमेश पाटील
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनगर नगरपंचातीत 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. उज्ज्वला थिटे यांचा आर्ज बाद झाल्याने आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्तापाटील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. या विजयाच्या जल्लोषात राजन पाटील यांचे सुपूत्र बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं. त्यांनतर बाळराजे
Nov 211 min read


नितिश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन
नवीन मंत्रीमंडळातील 26 मंत्र्यांनीही घेतली शपथ पटणा: बिहारमध्ये आज नवीन एनडीए सरकार स्थापन झाले. पटनाच्या ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात जनता दल (संयुक्त) चे प्रमुख नितीश कुमार यांनी विक्रमी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी गोपनियतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील 26 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 14 आणि जेडीयू कोट्यातील 8 मंत्र्यांचा सामावेश आहे. 26 मंत्र्यां
Nov 202 min read


मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही- काँग्रेस
मुंबई: मनसेसोबत आघाडी वा युती करण्यासाठी मुंबई वा महाराष्ट्रातून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे, त्याचा आदर पक्षाने राखला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. इंडिया आघाडी बाहेरचा पक्ष आघाडीत येणार असेल तर तसा प्रस्ताव सादर करावा त्यावर राष्ट्रीय पातळीवर निर्णय होईल. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे ठरवण
Nov 201 min read


भाजपचा शिंदे गटाला आणखी मोठा धक्का; शिवसेना मंत्र्याचा संताप
मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीच पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला असून, शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे, दरम्यान त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जळगावच्या जामनेरात नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी निवडणुकीत माघार घेत भाजपात प्रवेश केला आहे, यावरून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे. जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच
Nov 201 min read


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यात चर्चा
50 मिनिटांच्या चर्चेत, एकनाथ शिंदेंनी मायुतीमधील आपबिती मांडली नवी दिल्ली: राज्यात सध्या स्थाकिन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते आणि पदाधिकारी तर भाजपात प्रवेश करतच आहेत, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटातील अनेक
Nov 192 min read


उपमुख्यमंत्री अजित पवारांना आधी आव्हान, एका दिवसात राजन पाटील, बाळराजे पाटील यांचा माफीनामा
सोलापूर: “अजित पवार कोणाचाही करा, अनगरकरांचा नाद करु नका ” असं म्हणत भाजप नेते राजन पाटील यांच्या मुलाने बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्या ज्येष्ठ पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला होता. बाळराजेंच्या या वक्तव्यांचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला. दरम्यान, सं
Nov 192 min read


महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप?; एकनाथ शिंदे दिल्ली दौर्यावर, राज्यात हालचालींना वेग!
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर क
Nov 192 min read


अनगर नगरपंचायत: उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; राजन पाटलांच्या सूनबाईच बिनविरोध नगराध्यक्षा
सोलापुर/मोहोळ: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (दि.18) झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिी आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या
Nov 182 min read
bottom of page