top of page

54 वर्षानंतर होणारी मॉक ड्रिल कशी असणार ? देशभरातील 244 जिल्ह्यांचा समावेश; 1971 करण्यात आले होते ‘मॉक ड्रिल’




भारत- पाकिस्तान दरम्यान वाढत असणार्‍या तणावामुळे केंद्र सरकारने 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात आदेश काढले आहे. या दरम्यान हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. देशात यापूर्वी 1971 मध्ये मॉक ड्रिल करण्यात आले होते.


कोणत्या जिल्ह्यात होणार मॉक ड्रिल

मॉक ड्रिल देशातील 244 सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट ( नागरिक सुरक्षा जिल्हे) मध्ये होणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा निती आणि नागरिक सुरक्षा उपायासंदर्भात जागरुक करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. यासंदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा 1968 मध्ये संसदेत संमत करण्यात आला होता. हा कायदा सुपूर्ण देशात लागू आहे. त्यानंतरही शत्रू राष्ट्राचे लक्ष असणारा भाग, संवेदनशील ठिकाणांचा समावेश त्यात करण्यात आला. त्यात 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याची योजना आहे. हे जिल्हे भारत आणि पाकिस्तान सीमारेषेच्या जवळपास आहे. त्यात जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात.


नागरी संरक्षणाची उद्दिष्टे म्हणजे लोेकांचे जीव वाचवणे, मालमत्तेचे नुकसान कमीत कमी करणे हे आहे. तसेच लोकांचे मनोबल उंचावणे आहे. युद्ध आणि आणीबाणीच्या काळात नागरी संरणि संघटना महत्वाची भूमिका बजावतात. ज्यामध्ये ते अंतर्गत भागांचे संरक्षण करतात. सशस्त्रदलांना मदत करतात.


युद्धाचे सायरन?

आप्तकालीन परिस्थितीत सायरन वाजले जातात. या सायरनचा आवाज खूप मोठा असतो. दोन ते पाच किलोमिटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते. 120-140 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. त्या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो. आवाज हळूहळू वाढते त्यानंतर कमी होतो.


सायरन वाजल्यावर काय करावे?

सुरक्षीत स्थळी जाऊन थांबावे, 5 ते 10 मिनिटांत सुरक्षित स्थळी पोहचा, सायरन वाजल्यावर घाबरुन जाऊ नका, सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हा, घर आणि सुरक्षित इमारतींमध्ये जाऊन थांबा, टिव्ही, रेडिओ, सरकारी अलर्टसवर लक्ष द्या, अफवांवर विश्वास ठेऊ नका सरकारच्या निर्देशावर लक्ष द्या.


सायरन कुठे- कुठे वाजणार

सरकारी भवन, प्रशासनिक भवन, पोलिस मुख्यालय, सैन्य ठिकाणे, शहरातील मोठे बाजार, गर्दी असणारी ठिकाणे,


सिव्हील मॉक ड्रिल कोण- कोण?

जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन, सिव्हील डिफेन्स वार्डन, पोलिस, होम गार्ड्स, कॉलेज- शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय कॅडेट कोर ( एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना ( एनएसएस) नेहरू युवा केंद्र संघटन ( एनवायकेएस)

Comments


bottom of page