top of page

नांदेड रेल्वे स्थानकावर ‘मॉक ड्रिल’ चा थरार !





भारत- पकिस्तानच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 7 मे रोजीपासून मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार नांदेड रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आला. याचा थरारक अनुभव प्रवाश्यांनी प्रत्यक्षात अनुभवला.


भारताने पकिस्तानवर एअर स्ट्राईक करून दहशतवादी अड्यांचा खात्मा केला आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या अणुषंगाने नांदेड रेल्वे स्थानकावर बुधवारी पर्यटक व रेल्वे प्रवाशाच्या दृष्टिकोनातून मॉक ड्रिल घेण्यात आला. लोहमार्ग पोलिस, नांदेड पोलिस व एटीएस, क्यूआरटीचे अधिकारी, श्वानपथक, अग्निशमन दल यांनी संयुक्तपणे हे मॉक ड्रिल केले. प्रवाशांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. यावेळी प्रवाशांनी मॉक ड्रिलचा थरार अनुभवला.


Comments


bottom of page