top of page

राज्यभरात गॅस सिलेंडरसाठी रांगा: मुंबईत सिलेंडरसाठी पहाटेपासून रांगा , ग्रामीण भागालाही झळ; गॅस अभावी केटरसेवा ठप्प !

मुंबई: अमेरिका,इस्त्रायल- इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धास 13 दिवस उलटून गेले आहेत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम जगभरात होताना दिसून येत आहे. या युद्धामुुळे भारतालाही इंधन तुटवड्याच्या तीव्र झळा बसत आहेत. मुंबईतच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून इंधनाअभावी शहरातील 80 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.


जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत आहे. त्यामुळे अनेक तेल कंपन्यांनी 19 किलो आणि 5 किलोच्या व्यवसायिक सिलेंडरचा पुरवठा रोखला आहे. सध्या केवळ 20 टक्के सिलेंडर उपलब्ध असून या पुरवठ्यात 80 टक्क्यांची घट झाली आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या एचपीसीएल कंपनीबाहेर सिलेंडरसाठी शेकडो ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. या टंचाईचा फायदा घेत काळ्या बाजारात सिलेंडर दुप्पट ते तिप्पट दराने विकले जात आहेत. यामुळे अधिकृत दरातही 115 रुपयांची वाढ झाली आहे.


मनीज् कॅफेत चुली पेटल्या: गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका दक्षिण भारतीय खाद्यापदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मनीज् कॅफे’ ला बसला आहे. दादर आणि माटुंबा परिसरातील 5 ते 6 कॅफेमध्ये आता गॅसऐवजी लाकूड आणि कोळशाचा वापर करून चलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. या ब्रँडच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ आल्याचे तेथिल कामगारांनी सांगितले. कांदिवली, पोेईसर आणि मुंबईतील इतर झोपपट्टी परिसरात जिथे गॅस पाईपलाईन नाही, तिथे नगारिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पोहे आणि चहाच्या टप्या चालवणार्‍या छोट्या व्यवसायिकांकडे शेवटचा सिलेंडर शिल्लक आहे. त्यामुळे हा सिलेंडर संपल्यावर स्टॉल बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.


तर दुसरीकडे मुंबईतील कांदिवली पोईसर भागात गॅस सिलेंडरसाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. पोईसर हा एक मोठा झोपडपट्टी भाग आहे आणि येथे गॅस पाईपलाइन नाही. त्यामुळे येथे राहणार्‍या लोकांना गंस सिलेंडर न मिळाल्याने सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. लोक गॅस सिलेंडर घेऊन सकाळी 5 :00 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. आजही लोकांना गॅस सिलेंडर मिळतील की नाही याची कल्पना नाही. मुले,वृद्ध आणि महिलांसह सर्व लोक गॅस सिलेंडरसाठी वणवण करताना दिसत आहेत.


दरम्यान, केवळ एलपीजीच नव्हे, तर सीएनजी परुवठ्यालाही फटका बसला आहे. मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीतील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवसाला 5 ते 6 गाड्यांची आवश्यकता असताना केवळ 3 ते 4 गाड्या उपलब्ध होत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासोबतच औद्योगिक वसाहती आणि महामार्गावरील वाहतुकीवर सीएनजीचा मोठा परिणाम झाला आहे.


ग्रामीण भागातही परिणाम : ग्रामीण भागातही गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या आहेत. व्यवसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल व्यवसायिक चुलीचा पार्याय शोधताना दिसून येत आहेत. घरगुती गॅस बुकींगसाठी 25 दिवसांची कालमर्यादा ठरवून दिल्याने ग्राहक किमान एक सिलेंडर शिल्लक ठेवण्याच्या तयारीत रांगेत उभा आहे.


गावखेड्यात चुली पेटल्या: गॅस तुटवड्यामुळे पारंपारीक इंधनाचा मार्ग अवलंबत गावखेड्यात तब्बल तीन तपानंतर आता चुली पेटल्या आहेत.


समारंभावर परिणाम : गॅस तुटवड्यामुळे लग्नासह इतर कौटुंबीक समारंभावर परिणाम झाला आहे. व्यवसायिक गॅस अभावी केटरींगच्या कामांना ब्रेक लागल्याने समारंभ पुढे ढकण्यात येत आहेत. तर कित्तेक समारंभ रद्द करण्यात येत आहेत. केटरींग व्यवसायिकांनाही आता गॅस भट्ट्या ऐवजी धुराला आलिंगन देत चुलांगन (मोठी चूल) ला नाविलाजाने पसंती द्यावी लागणार आहे.

Comments


bottom of page