top of page

जरांगे पाटलांची दक्षता घेण्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रशासनाला सूचना

जालना: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. रणरणत्या उन्हात बाज टाकून जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. अशातच आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला मोठा आदेश दिला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी तसेच जरांगे पाटलांची तब्येत बिघडू नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना मंत्री पकंजा मुंडे यांनी दिल्या आहेत.


जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधील शेतात जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरूवात केली. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे आणि जरांगे पाटलांची तब्येत बिगडू नये याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची आणि भेटण्याची तयारी दर्शवली आहे.


परभणीचे खासदार बंडू जाधव उपोषणस्थळी: परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंदू जाधव यांनी उपोषणस्थळी जरांगे पाटलांची भेट घेतली. ‘ ज्या सरकारने घोषणा केली, त्यापेक्षा जरांगे पाटील यांची मागणी काही वेगळी नाही. फक्त मागण्यांची पूर्तता करण्याचा विषय आहे. भर उन्हात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांना सरकार फक्त बघतय. उष्माघाताने जरांगे पाटील यांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल. हा राज्यातील संपूर्ण मराठा समाजाचा विषय आहे. दुर्दैवाने काही झाल्यास उद्रेक होईल. तात्काळ उपोषण संपवून मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. सरकार फसवणूक करत आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा, असं खासदार जाधव यावेळी म्हणाले.

Comments


bottom of page