top of page

सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल, जरांगे पाटील उपोषण सोडणार? ; जरांगे पाटलांची अभ्यासकांसी चर्चा

जालना: मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज रखरखत्या उन्हात अमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणा पूर्वी सरकारच्या शिष्ठमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली, मात्र मागण्यावर ठाम राहून जरांगे यांनी उपोषण सुरू केले. उपोषण सुरू होताच सरकार दरबारी हालचालींना वेग आला. जरांगे पाटीलयांच्या मागण्यांनुसार सरकारने अश्वासनाचा मसूदा शिष्ठमंडळासमवेत आंदोलनस्थळी पाठवला. पण अभ्यासकांशी चर्चेनंतर निर्णय घेण्याचे जरांगे पाटील यांनी शिष्ठमंडळास अश्वस्थ केले होते. त्यानुसार रात्री उशीरा सरकारेच शिष्ठमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले.


मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आज शनिवारी (दि.29) अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले. उपोषण सुरू होताच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांचे शिष्ठमंडळ आंदोलनस्थळी दाखल झाले. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंमलबजावणी संदर्भात 14 मागण्यांचा अश्वासीत मसूदा त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सोपवला. त्यानुसार जरांगे पाटील यांनी शिष्ठमंडळास सायंकाळी अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सांगितले होते.


त्यानुसार जरांगे पाटील यांनी अभ्यासकांना अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन केले. सायंकाळी जरांगे पाटील आणि अभ्यसकांत चर्चा झाली. त्यानंतर रात्री उशीरा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड हे आंदोलनस्थळी जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी दाखल झाले.


दरम्यान, सकाळी शिष्ठमंडळाने दिलेल्या मसूद्यामध्ये जरांगे पाटील यांनी काही बदल सूचवले होते. त्यामध्ये बदल करून तयार केलेला मसूदा शिष्ठमंडळ घेऊन आलं असावं!, अभ्यासंकांनी सूचवलेल्या मसूद्यातील त्रुटीवर जरांगे पाटील शिष्ठमंडळासमोर भूमीका मांडणार आहेत. शिष्ठमंडळाशी चर्चे नंतर आंदोलनातून मार्ग निघणार का? आंदोलन लांबणार हे लवकरच समोर येणार आहे. असून जरांगे पाटील यांच्या कठोर अमरण उपोषण आंदोलनाचे राज्यभरात पडसाद उमटत असून अंतरवाली सराटी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.


शिष्ठमंडळ छत्रपती संभाजीनगरात तळ ठोकून: जरांगे पाटील यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी काल (शुक्रवार दि.28) पासून सरकारचे शिष्ठमंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संंभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत.

Comments


bottom of page