top of page

एलपीजी गॅसच्या तुटवड्यावर एनसीएल च्या संशोधकांनी शोधला पर्याय

एलपीजी प्रमाणेच डिएमई गॅसचा शोध; पुण्याच्या पिरंगूटमध्ये कारखाना

पुणे : इराण- इस्त्रायल युद्धाची मोठी झळ सध्या जगभरातील अनेक देशांना बसली आहे. विशेषत: पूर्व आशियातील देशांना यामध्ये भारतालाही तेल आणि गॅसचा पुरवठा कमी झाल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. भारतात घरगुती गैस अर्थात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकांच्या सिलिंडर रिफिल करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. पण याच आपदा मे अवसर या म्हणीप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) मधील संशोधकांनी या एलपीजी गॅसला नवा पर्याय शोधला आहे. विशेष म्हणजे या नव्या पर्यायी गॅसच्या प्रकल्पालाही सुरूवात झाली आहे.


एनसीएलच्या संशोधकांनी हा पर्याय म्हणजे डीएमई म्हणजेच डाय मिथाईल इथर नावाचा नवा गॅस शोधून काढला आहे. या गॅसचा वापर घरातील गॅसच्या शेगड्यांद्वारे स्वयंपाकासाठी वापर करता येऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. स्वयंपाक आणि वाहनांना इंधन म्हणून या गॅसचा वापर करता येऊ शकतो. विशेष म्हणजे हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा जास्त शक्तीशाली आहे.


पिरंगुटजवळ कारखाना : पुण्याजवळच्या पिरंगूट येथे या गॅस उत्पादनाचा कारखाना देखील सुरू होत आहे. जर मोठ्या प्रमाणावर या गॅसचं देशांतर्गतच उत्पादन सुरू झालं तर भारताला बाहेर देशांवरील गॅससाठीचं अवलंबित्वही कमी होईल. गेल्या वर्षभरापासून एनसीएलच्या संशोधकांकडून यावर संशोधन सुरू होतं. पिरंगुट इथं या गॅसच्या उत्पादनाचा पायलट प्रकल्प सुरु झाला आहे. जर सरकारनं या गॅसच्या उत्पादनाला परवानगी दिली तर त्यामुळं नागरिकांपर्यंत एलपीजीसाठी नवा पर्याय उपलब्ध होईल.


दरम्यान, डायनामिथाईल इथर हे एलपीजीसारखं इंधन आहे. याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एलपीजीसारख्या आहेत. घरातील सिलिंडरमध्ये त्यात 7 बारला एलपीजी भरला तर तो लिव्किफाय होतो. आपल्या घरातील सिलिंडरमध्ये अर्ध लिक्विड आणि अर्धा गॅस असतो. हा गॅस जसा वापरला जातो तसा यातील लिक्विडचंही रुपांतर गॅसमध्ये होत राहतं. याच प्रमाणे खरंतर एलपीजीला या गॅसद्वारे रिप्लेस करता येऊ शकतो. पण सध्याच्या परिस्थितीत याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डीएमई हा गॅस 8 टक्के एलपीजी सोबत मिक्स करून वापरणे किंवा 20 टक्क्यांपर्यंत हा गॅस आपण एलपीजीमध्ये मिक्स करू शकतो, अशी माहिती या प्रकल्पावर काम करणार्‍या एका संशोधकांनी दिली आहे.

Comments


bottom of page