top of page

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट? पीए अमृत डावकर यांच्या दाव्याने खळबळ

ree

बीड: मंगळवारी राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. जरी सर्वत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडलं असलं तरी काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडच्या गेवराई नगरपरिषदेसाठी निवडणुकीचे मतदार सुरू असताना जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. गेवराईमध्ये काल नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि मारहाणीची घटना घडली आहे. त्यानंतर अमृत डावखर यांच्याकडून या प्रकरणांसंदर्भात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.


माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डवकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. लाठ्या-काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आल्याची माहिती अमृत डावकर यांनी दिली आहे. एवढेच नाही तर बाळराजे पवार यांनी आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी अमरसिंह पंडित यांच्या बाबात विचारणा केली, त्यांच्या खुनाचा कट रचून ते घरी आले होते, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता, त्यांच्यासोबत कही अनोळखी लोक होते. माझा देखील जीव गेला असता, मात्र गाडी चालकाने मला सोडवलं. अशा प्रकारचा धक्कादायक दावा, अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केला आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.


मारहाणीत डावकर जखमी: मंगळवारी झालेल्या राड्यात अमृत डावकर यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. ते या घटनेत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यानंतर आता डावकर यांनी केलेल्या दाव्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Comments


bottom of page