लालबागच्या राज्याच्या विसर्जनाची वेळ ठरली

लालबागच्या राज्याच्या विसर्जनाची वेळ ठरली
Published By: Navnath Yewale
Published On:

भरतीचे पाणी ओसरल्यावर रात्री श्रद्धेने विधिवत होणार विसर्जन

मुंबई: मुंबईकरांचे लाडके दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या. विसर्जन समुद्राच्या भरतीमुळ—— थोडा विलंब झाला आहे. गिरगाव चौपाटीवर राजाची मूर्ती विसर्जनासाठी पोहोचल्यावर अचानक भरतीचे पाणी वाढल्याने विसर्जन थांबले. मात्र, यामुळे भाविकांची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही, उलट ते शांतपणे आपल्या राजाच्या निरोपाची वाट पाहत आहेत.

मुंबईकरांचा लाडका बाप्पा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनास यंदा समुद्राने मोठा अडथळा निर्माण केला आहे. सकाळपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी उभा आहे. मात्र समुद्राला उधान आल्याने नव्या तराफ्यावर मुर्ती चढवण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लालबाच्या राजाचे विसर्जन लांबले असून समुद्र शांत झाल्यावर मुती विसर्जित करण्यात येणार आहे. लालबागच्या मंडळासाठी गणेश गल्लीचं मंडळही धावून आले असून गणेश गल्लीचे कार्यकर्ते मदतीसाठी आहेत.

आज सकाळी सुमारे साडे आठच्या सुमारास लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आगमन झाले त्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. त्याचवेळी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे तराफ्याजवळ आगमन होताच वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मुर्तीची पाट तरंगू लागला. त्याचा परिणाम असा झाला की, लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मुर्तीचा पाट यांची भारतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती.

दिड तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचे पाणी कमी होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राच्या भरतीचे पाणी कमी झाल्यावर करण्यात येणार आहे. गेल्या आठ तासापासून भाविकही लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा पाण्यासाठी गिरगाव चौपाटीवर थांबून आहेत. मात्र राजा आठ तासांपासून पाण्यात थांबून असल्याचे त्यांच्याही चेहर्‍यांवर चिंता दिसत आहे.

दरम्यान, सायंकाळी 5:00 च्या नंतर ओहोटीला सुरुवात झाल्याने भरतीचे पाणी कमी होत आहे. लालबागचा राजा मंडळाकडून विसर्जनाची वेळ ठरविण्यात आली आहे. रात्री 10:30 ते 11:00 या वेळेत लालबागच्या राजाचे मोठ्या श्रद्धेने विधिवत विसर्जन होणार असल्याचे मंडळाकडून जाहिर करण्यात आले आहे.

Related Posts