म्हणूनच शिक्षकांना TET आवश्यक.
इयत्ता सहावीत शिकत असलेल्या चिमुकल्या विध्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अत्यंत संतापजनक आणि शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना दूर एखाद्या ग्रामीण भागात घडली नसून मुंबई शहराला खेटूनच असलेल्या वसई शहारात घडली. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचे अक्षरशः धिंडवडे निघाले. आशिका गौड नावाची केवळ १२ वर्षीय चिमुकली वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिकत होती. हे शिक्षण घेत असताना ती आपल्या आयुष्याची सुंदर अशी स्वप्ने रंगवत होती. आई...