top of page

म्हणूनच शिक्षकांना TET आवश्यक.

ree

इयत्ता सहावीत शिकत असलेल्या चिमुकल्या विध्यार्थिनीला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने   तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अत्यंत संतापजनक आणि शिक्षणक्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना दूर एखाद्या ग्रामीण भागात घडली नसून मुंबई शहराला खेटूनच असलेल्या वसई शहारात घडली. यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचे अक्षरशः धिंडवडे निघाले. आशिका गौड नावाची केवळ १२ वर्षीय चिमुकली वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत शिकत होती.  हे शिक्षण घेत असताना ती आपल्या आयुष्याची सुंदर अशी स्वप्ने रंगवत होती. आई बाबांनाही आपल्या लेकीचा हेवा वाटत होता. पण एके दिवशी या चिमुकलीचा विद्येचे मंदिर असलेल्या शाळेनेच घात केला. शाळेत यायला उशीर झाला  म्हणून त्या नालायक   असे कृत्य त्या शिक्षकांने त्या चिमुकल्या मुलांसोबत केले. होय नालायक शब्दाला लाज वाटेल असे क्रूर कृत्य करण्यात आले. कारण काय! तर....म्हणे शाळेत येण्यासाठी उशीर झाला.

 

  उशीर झालेल्या अशा अनेक मुलांना पाठीवर दप्तर घेऊन तब्बल शंभर उठाबश्या काढण्यची शिक्षा या नालायक शिक्षकांने दिली. यात सहावीत शिकणाऱ्या आशिका या चिमुकलीचाही समावेश होता.  शाळेतून घरी पोहचताच  आशिका हिची प्रकृती बिघडली. त्यामुळे आशिकाला तातडीने वसईच्या 'आस्था' रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आशिकाची प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. आशिकाच्या मृत्यूमुळे तीच्या आईबाबांच्या पायाखालची जमीन सरकली गेली. आभाळ कोसळले गेले. कोणाही व्यक्तीच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर असेच झाले असते. या साऱ्या क्रूर घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले. शाळेला टाळे ठोकून संतप्त पालकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली हे ठीक आहे.  पण टाळे ठोकणे हा तात्पुरता इलाज आहे. शाळेचे संचालक मंडळ आणि शिक्षकांनाही याची जाणीव असते.

 

त्यामुळे पुढील महिना दोन महिने या शाळेतील शिक्षक आणि संस्था चालक निर्लज्जपणाने मान खाली घालून पालकांना, संतप्त समाजाला हात जोडत शाळेत येतील. किंबहुना चिमुकल्या विध्यार्थ्यांना शिक्षा देणाऱ्या त्या नालायक शिक्षकाची शाळेतून  हकालपट्टीही करतील. पण यामुळे नाहक जीव गमावलेली आशिका परत येणार का! किंवा शिक्षक तिला आणतील का! असा प्रश्न आहे. त्यामुळेच अशा नालायक शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सह आरोपी म्हणून मुख्याध्यापकांना करायला हवे.  कारण विद्यार्थ्यांना अशा प्रकारची क्रूर शिक्षा ८ नोव्हेंबर रोजी प्रथमच देण्यात आली होती असे मुळीच नाही. यापूर्वीही अशा किंवा त्यापेक्षा क्रूर शिक्षा या शिक्षकांने विद्यार्थ्यांना दिलेल्या असाव्यात. परंतु चिमुकल्या आशिकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हनुमंत विद्यामंदिरचे काळे कारनामे सर्वांसमोर आलेत. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शंभर उठाबश्या काढायला सांगणे व तेही पाठीवर दप्तर घेऊन.

 

 किती क्रूरपणाची ही सीमा आहे. हा नालायक शिक्षक जेव्हा हे क्रूर कृत्य करत होता तेव्हा शाळेतील इतर शिक्षक आणि मुख्याध्यापक काय करत होते! फिदी फिदी हसत होते का! असा प्रश्न निर्माण होतो. जर इतर शिक्षक हसत नव्हते तर या शिक्षकाला कोणीच का रोखले नाही असाही प्रश्न निर्माण होतो! म्हणूनच या कटात सामिल असलेल्या सर्व शिक्षकांवर सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आलेली आहे. जर या साऱ्या शिक्षकांना दप्तर पाठीवर घेऊन शंभर उठाबशा काढायला सांगितले तर काय होईल! याचे भान शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या साऱ्याच शिक्षकांनी ठेवायला हवे. आधीच शिक्षकांच्या नावाने राज्यात आणि देशात ओरड सुरु आहे. शिक्षकांचे ज्ञान किती अगाध आहे हे वेगळे काही सांगण्याची गरज नाही. सर्वच शिक्षकांच्या बाबतीत असे बोलणे जरी उचित नसले तरी राज्यातील ९० टक्के शिक्षकांची अवस्था अशीच आहे असे म्हणावे लागेल. प्राथमिक शाळेत शिकविणारे अनेक शिक्षक तर पदवीधर झालेलेच नाहीत आणि ज्यांनी पदवी घेतली आहे ती कोणत्या विद्यापीठातून घेतली हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

 

 माध्यमिक शाळेतही हिच अवस्था आहे. शिक्षक होण्यासाठी  पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुणांची आवश्यकता असते. तर प्राथमिक शिक्षकांसाठी १२ वी परीक्षेत  ६० टक्के गुणांची आवश्यकता असते. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेत पालक सभेला शिक्षकांनी मिळविलेल्या गुणांची मागणी केली तर शिक्षक किती ज्ञानी आहेत हे समजून येईल. शिक्षकांनाही आपल्या ज्ञानाची जाणीव आहे म्हणूनच हे सारे शिक्षक  'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET) देण्यापासून पळ काढत आहेत. लपून बसलेले आहेत. २०१० साली महाराष्ट्र राज्याने 'शिक्षणाचा हक्क' कायदा स्वीकारून त्याची अंमलबजावणी केली. या कायाद्यानुसार प्रत्येक शिक्षकांने 'शिक्षक पात्रता परीक्षा' देणे बंधनकारक आहे. पण आज १५ वर्षे झालीत किती शिक्षकांनी TET परीक्षा दिली असे जर कोणी विचारले तर राज्यातील ९० टक्के शिक्षकांनी परीक्षा दिलीच नाही असेच म्हणावे लागेल. कारण शिक्षकांचे अगाध ज्ञान.

 

 याच अगाध ज्ञानामुळे  'शिक्षक पात्रता परीक्षे'चा (TET) निकाल अवघा दोन किंवा तीन टक्के लागत आहे. म्हणजेच शंभर शिक्षकांपैकी फक्त दोन - तीन शिक्षक उत्तीर्ण होत आहेत. म्हणूनच स्वतःला ज्ञानी समजणारे शिक्षक भीतीने या परीक्षेपासून पळ काढत आहेत. अखेर सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावे लागले की येत्या दोन वर्षात शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली नाही तर  त्यांची नोकरीवरून हकालपट्टी करा.  यामुळे शिक्षकांचे पुरते धाबे दणाणले. त्यातूनच या परीक्षमधून आमची सुटका करा असे शिक्षकांच्या संघटना शासनाजवळ सातत्याने विनंती करत आहेत. जे शिक्षक स्वतः परीक्षेपासून पळ काढत आहेत ते मात्र  विविध परीक्षेला बसण्यासाठी विध्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर दबाव टाकत आहेत. त्यासाठी विधार्थ्यांना क्रूरपणाची शिक्षा करत आहेत. वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत हाच प्रकार घडला शिक्षणक्षेत्राला लाज आणणारा हा शिक्षक नक्कीच TET उत्तीर्ण नसावा किंबहुना शिक्षण हक्क कायद्याचे वाचन केलेला नसावा.  त्यामुळेच त्याने विद्यार्थ्यांना क्रूर शिक्षा केली. म्हणूनच सर्वच शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे गरजेचे आहेच आणि उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अधिकारच नाह

 

 

सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक
संपादक, वृत्तमानस, मुंबई 
मंगळवार दि. १८ नोव्हेंबर २०२५
दूरध्वनी : 8928055927.

Comments


bottom of page