पुण्यात न्यायालयाच्या आवारात रक्तरंजीत राडा, तरुणावर गोळीबारानंरत कोयत्याने हल्ला

पुण्यात न्यायालयाच्या आवारात रक्तरंजीत राडा, तरुणावर गोळीबारानंरत कोयत्याने हल्ला
Published By: Navnath Yeole
Published On:

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबाराची घटना समोर आली आहे, (बुधवारी दि.25) मंदार किवळे या तरुणावर शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 समोर सहाजणांच्या टोळक्याने हल्ला केला. या टोळक्याने मंदार किवळे वय (35) याच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला. कायेत्याच्या वारापासून वाचण्यासाठी मंदारने आपले हात डोक्याभोवती घेतले होते. मात्र, हल्लेखोरांनी सपासप वार केल्याने मंदार किवळे याच्या दोन्ही हातांना गंभीर दखापत झाली. त्याच्या डाव्या हाताचा पंजा, तर मनगटापासून वेगळा होऊन लोंबकळत होता. 

मंदार किवळे हा शुभम चव्हाण हत्याप्रकरणातील आरोपी आहे, गेल्या दिड वर्षांपासून तो तुरुंगात होता. दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. बुधवारी त्याची कोर्टात पहिली हजेरी होती. त्यासाठी मंदार न्यायालयात आला असताना त्याच्यावर हल्ला झाल्याचे मंदार किवळेंच्या वकिलांनी सांगितले. किवळे याच्या वकिलांनाी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले. हल्लेखोर शस्त्र घेऊन कोर्टाच्या आवारात येतात. ही शहरातील कायदासुव्यस्थेविषयी प्रश्न निर्माण करणारी स्थिती आहे. मी मंदार किवळे याच्यावर निर्घुणपणे हल्ला होताना पाहिले. माझ्या डोळ्यासमोरच हा सगळा प्रकार घडला. शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारच्या बाहेर मंदारवर हल्ला झाला. इकडे मोठा पोलीस फौजफाटा असतो, असा अरोप मंदार किवळेंच्या वकिलांनी केला. 

मंदार किवळेंचे वकिल म्हणाल्या की, मंदारवर हल्ला होत असताना त्याला वाचवायला कोणीही पुढे आले नाही. शुभम चव्हाण हत्याप्रकरणात त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्याला हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता. तो आज कोर्टाच्या तारखेसाठी आला होता. आज पहिलीच तारीख होती. आमचं बोलणं झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की, तुझी तारीख झाली, तु आता घरी जा. त्यानंतर तो चालत घरी निघाला, मी देखील माझ्या कामाला गेले. मी जात असताना बाहेर काही लोकांनी मंदारला पकडल्याचे मला दिसले. तो त्यांच्या तावडीतून पळत होता, पडत होता, तेव्हा एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळी झाडली. त्याच्यावर एकूण तीन गोळ्या झाडल्याचे मला ऐकू आले.

 मला याचे गांभीर्य लक्षात आल्यावर मी पोलिसांना म्हटले की, फायरिंग होतेय, काहीतरी कारवाई करा, पण पोलिसांनी काही हालचाल करेपर्यंत मंदार धावत पुढेत गेला होता  आणि तो पडला आणि हल्लेखोरांनी डाव साधला. तो जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता तेव्हा 10 ते 15 मिनिटे एकही रुग्णवाहिका आली नाही. मी प्रत्येक रिक्षावाल्याला हात जोडून थांबण्याची विनंती करत होते. पण एकानेही माणुसकी दाखवली नाही. मंदार हा एक आरोपी असेल पण आधी त्याच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहायला हवे होते. मंदारवर फायरिंग होऊनही एकही पोलिस त्याला वाचवायला किंवा हल्लेखोरांना पकडायला पुढे आला नाही, असे मंदार किवळेंच्या वकिल म्हणाल्या. 

हल्लेखोरांचे कोयत्याचे वार चेहर्‍यावर, डोक्यावर होऊ नये म्हणून मंदार किवळे प्रयत्न करत होता. गोळ्या लागूनही जखमी अवस्थेत मंदार धावत होता. रस्त्यावर धावताना एके ठिकाणी डोक्याभोवती हात गुंडाळून मंदार किवळे खाली बसला. मात्र, हल्लेखोरांनी मागचापुढचा विचार न करता वरुन कोयत्याने सपासप घाव घातले. या धारदार कोयत्याचे वार मंदार किवळेने हातावर झेलले. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताचा पंजा मनगटापासून वेगहा होवून लोंबकळत होता. हल्लेखोर पळून गेल्यानंतर मंदार किवळे उठून रस्त्याच्या पलीकडे आला आणि खाली कोसळला. त्यानंतर बराच वेळ तो रक्ताच्या थारोळ्या पडून होता. त्याच्या अंगात उठण्याचेही त्राण नव्हते. त्यामुळे तो डोळ्यांची उघडझाप करत सभोवताली जमलेल्या गर्दीकडे पाहत होता. हे दृश्य अंगावर काटा अणणारे होते. त्यानंतर पोलिसांनी रिक्षातून त्यास उपचारार्थ रुग्णालयात हलवले, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. 

Related Posts