मनोज जरांगेंच्या घरी एसआयटी पथक

मनोज जरांगेंच्या घरी एसआयटी पथक
Published By: Navnath Yeole
Published On:

जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या अंकुशनगर, महाकाळा-शहागड (ता. अंबड) येथील घरी आज बुधवार (दि.25) एसआयटी पथक दाखल झाले.  500 कोटी देवण-घेवाण प्रकरणाच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी पथकाने जरांगे यांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत 500 कोटींच्या देवाण-घेवाणीची कथित ऑडिओ क्लिप माध्यमांच्या प्रतिनिधींना ऐकवून ती व्हायरल केली होती. या कथित ऑडिओ (वृत्तमाणस ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही) क्लिपमध्ये जरांगे यांना पाचशे कोटी रुपये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत दिल्याचा संवाद आहे. 

अज्ञात पाच व्यक्तींच्या संवाद असलेल्या या ऑडिओक्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. महायुतीचा घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) भाजप आमने समाने आल्याचे महाराष्ट्राला ज्ञात आहे. कथित ऑडिओ क्लिपची कसून चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईचे अश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास करुन सत्य जनतेसमोर आणण्याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्वस्त केले होते.

मनोज जरांगे यांनी या क्लिपमधील ज्या व्यक्ती आहेत, त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली तर, शिवसेना (शिंदे गट) कडून ही भाजपची माणसं असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि मनेाज जरांगे यांच्या शाब्दीक संघर्ष झाला होता. 
मधल्या काळात जरांगे यांना एसआयटी मार्फत पत्र पाठवून क्लिप कशी उपलब्ध झाली. कोणाकडून उपलब्ध झाली या बाबत विचाराणा करण्यात आली होती. त्यावर जरांगे पाटील यांनी आपण सरकारला त्या व्यक्तीचे नांव द्यायला तयार आहोत पण त्याच्यासह त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी अट घातली होती. शिवाय क्लिप बाबत जी मदत हवी असेल ती करण्यास तयारीही जरांगे यांनी दाखवली होती. 

त्या अनुषंगाने बुधवारी एसआयटी पथक मनोज जरांगे यांच्या अंकुशनगर येथील घरी दाखल झाले. परथकान ऑडिओ क्लिप प्रकरणी विचारपूस केल्याचीही माहिती आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी ऑेडिओ क्लिप बाबत माहिती दिली का?, ती ऑडिओ क्लिप जरांगे पाटील यांच्याकडे कोणी दिली, तब्बल आडिच वर्षांनंतर ही ऑडिओ क्लिप जरांगे पाटील यांच्याकडे कधी आली, दसरा मेळाव्यानंतरच ती व्हायरल का केली? अशा एसआयटीच्या विविध प्रश्नांना जरांगे यांनी काय माहिती दिली हे लवरच समोर येणार आहे.