संगिता वानखेडेंचा व्हिडिओ : शेवटचा व्हिडिओ, मंत्रालयासमोर जीवन संपवणार!

संगिता वानखेडेंचा व्हिडिओ : शेवटचा व्हिडिओ, मंत्रालयासमोर जीवन संपवणार!
Published By: Navnath Yeole
Published On:

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लिल शब्दात टिका करणार्‍या संगिता वानखेडे यांचा भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी रात्री मी हा मी व्हिडिओ बनवतेय, हा शेवटचा व्हिडिओ आहे, गुरूवारी मी मंत्रालयासमोर मी माणे जीवन संपवणार आहे. संगिता वानखेडे नाही तर एक आई हारल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलीं दत्तक घेण्याची सादही त्यांनी घातली आहे. 

सोशल मिडियावरचं परिचीत असलेल्या मनोज जरांगे यांच्यावर शिवराळ भाषेत टिका करणार्‍या संगिता वानखेडे या गेल्या तीन वर्षापासून जरांगे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिकेची संधी सोडत नाहीत. मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथील आंदोलनात लाठीचार्जनंतर आंदोलनातून जरांगे पाटील मंत्री छगनभुजबळ यांच्यावर टिका करत होते. मंत्री भुजबळ आणि जरांगे यांच्यातील शब्दीक संघर्ष उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. छगन भुजबळ यांना खरे खोटे सुनावल्यानंतर संगिता वानखेडे यांना भुजबळ समर्थकांकडून ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर वाखेडे यांनी जरांगे पाटीलांवर टिकेची झोड उठवली. तेव्हापासून संगिता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर टीकेची संधी सोडली नाही. अगदीच शेवटचा व्हिडिओ म्हणत त्यांनी जरांगेंच्या टोळीपासून मला खूप त्रास होत असल्याचं त्या म्हणल्या. 

पुण्यातील मारणे-कोंडे प्रकरणात संगिता वारखेडे यांचे नांव समोर आल्यानंतर एका पाठोपाठ एक अशा संगिता वानखेडे यांच्या कथित ऑडिओक्लिप (वृत्तमाणस ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)  सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या. ज्यामध्ये संगिता वानखेडे यांचा खाजगी संवादाचाही समावेश आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे यांच्यावर टिका करणार्‍या मोजक्यां लोकांमध्ये पहिल्या क्रमांकावर संगिता वानखेडे, अजय बारस्कर, अजय बारस्कर यांच्यासह इतर काहीजण आहेत. जरांगे पाटलांच्या अलिकडच्या उपोषणानंतर त्यांच्यावरील टिकाकारांच्या संख्येत भर पडली. मात्र, संगिता वानखेडे जरांगे पाटलांच्या सहकार्‍यांना कायम चेले चपाटे, लाभार्थी टोळी अशा शब्दात टिका करत असतात. अलिकडच्या काळात त्यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यामुळे व्यथित होऊन संगिता वानखेडे यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

त्या म्हणतात की, शेवटचं जय जीजाऊ कारण मी उद्या नसणार आहे. संगिता वानखेडे हारली नाही तर एक आई हारली आहे. मला माहित आहे या लोकांवर कठोर करावाई होणार नाही, जरांगेच्या टोळीमुळे खूप त्रास झाला. मला, माझ्या मुलींना, आईंना खूप त्रास झाला. माझ्या मुलींना एकनाथ शिंदे साहेब दत्तक घ्या. मी आज बुधवारी सायंकाळी व्हिडिओ करतेय, गुरुवारी मंत्रालयासमोर मी आत्महत्या करणार असल्याचं म्हत संगिता वानखेडे यांनी रडताना भावनिक अवाहन केले.  

Related Posts