top of page

नागपूरात उद्या ओबीसींची तातडीचे बैठक

ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार!; मुधोजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


नागपूर: राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सरकारचा या निर्णयावर ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी कोर्टाृत जाण्याची तयारी दर्शविली आहे. अशातच आता ओबीसी समाजातील नेत्यांनी मोठा निर्णण घेतला आहे.


प्राप्त माहितीनुसार विदर्भातील नेत्यांनी उद्या नागपूरात महत्वाची बैठक आयोजी केली आहे. या बैठकीला राजकीय नेते, ओबीसी कार्यकर्तेआणि वकिल महासंघाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या रवी भवनामध्ये अयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विजय वडेट्टीवार, सुधाकर अडबोले, किशोर लांबट हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मुधोजी राजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली आहे. या निवेदनात मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाही असं मुधोजीराजे यांनी म्हटलं आहे.

मुधोजीराजेंनी दिलेल्या निवेदनानुसार मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नुकतेचं मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानांवर आंदोलन झाले. यात मराठ्यांना काय मिळालं? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदेालनाला माझा पाठिंबा आहे. परंतु त्यांनी जी मागणी केली ती मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या.


या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं? कारण मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यात आर्थातच काही त्रुट्या आहेत. परंतु ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना लाभ नक्कीच मिळावा. कागदपत्राची पूर्तता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार यात मात्र शंका नाही. उर्वरित अंदाजे 2.50 करोड मराठ्यांच काय आहे? असा प्रश्न मराठ्यांना सतावतो आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझे व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनचं सरसकट आरक्षण मिळावे जेणेकरून हा पेच निर्माण होणार नाही.


संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनचं “ मराठा आरक्षणाचा” फायदा होईल. मराठ्यांना मराठा म्हणूनचं सरसकट आरक्षण कृपया द्यावे जेणेकरून 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे, उर्वरित 2.5 करोड मराठ्यांना ‘ मराठा आरक्षणाचा ’ फायदा होईल. माझी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की,मराठ्याचं नुकसान कृपया होवू देऊ नका असंही मुधोजीराजे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

Comments


bottom of page