top of page

वित्तीय समावेशन संतृप्तीकरण अभियान व ऋणशिबिराचा डहाणू येथे आयोजन



डहाणू:  20 ऑगस्ट 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे पंचायत समिती हॉल, डहाणू येथे वित्तीय समावेशन संतृप्तीकरण अभियान आणि ऋणशिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय कार्यालय, संचलन कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व शाखांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात केंद्रीय कार्यालयाचे महाप्रबंधक कुशल पाल, क्षेत्रीय प्रबंधक सुरेश कुमार सिंह, उपआंचल प्रबंधक शेख बुशडा आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित ग्राहकांना विविध बँकिंग योजना, सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामाजिक योजना (PM-SBY, PMJJBY, APY), डिजिटल बँकिंग, सायबर सतर्कता इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.क्षेत्रीय प्रबंधक सुरेश कुमार सिंह यांनी विविध योजनांबद्दल विस्ताराने माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सतर्कता जागरूकता अभियानांतर्गत अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांनी निष्ठा, पारदर्शकता व भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा केली.


या कार्यक्रमात वडकुण व गंजाड शाखेतून सुमारे ७ कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडकुण शाखेचे प्रबंधक अमोल गायकवाड यांनी केले. यावेळी सेंट्रल बँकेचे प्रबंधक विजय राजभर, संदीप गौतम, ज्ञानेश्वर उभरेकर, कांच पटेल, संदीप कुमार सिंह यांनीही उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले.सरकारी विभागांचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी अनिल नालगुंवार, रबर बोर्ड ऑफ इंडियाच्या भूगर्भशास्त्रज्ञ मीना सिंग, तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाचे अधिकारी आदी मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.या उपक्रमामुळे आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक योजनांचे लाभ आणि डिजिटल व्यवहाराबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली असून, कार्यक्रमाची सांगता “सर्वांगीण विकास व विश्वासासह सेवेसाठी तत्पर” या संदेशाने करण्यात आली.

Comments


bottom of page