नांदेडमध्ये मेडिकलच्या विद्यार्थीणीची आत्महत्याकुटुंबीयांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध पोलिसात गुन्हा
नांदेड: महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्या युवतीने वसतिगातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.5) घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असूनप मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरेाप केले आहेत. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दालख करण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले आणि अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेणार्या एका 25 वर्षे विद्यार्थीनीने वसतिगृहात आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी जीवन घोगरे यांनीच संबंधित विद्यार्थीनीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, दाखल केलेल्या फिर्यादीतही जीवन घोगरे यांने नाव घेतले आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्या वसतिगृहामध्ये आकांक्षा गायकवाड ही विद्यार्थीनी राहत होती, गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. त्यामुळेच, माझ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी केली आहे.
आकांक्षा मुंजाजी गायकवाड असे मयत मुलीचे नांव आहे. वसतिगृहाची फीस थकल्याने वसतिगृहचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे हे मानसिक त्रास देत होते, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, “ असा अरोप पिडित कुटुंबीयाने केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध अॅट्रॉसिटीअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेने एकच खळबळ उडाली आहे.