top of page

एक गेला आता दूसरा तयार कतोय, जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेवर निशाना!मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीबाबतही खुलासा; दोघे ही आमचेच

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्तेनंतर मागिल महिन्यात पार पडलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीस पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुक निकालावरुन जरांगे पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. यावर जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला.

बीडच्या मस्साजोग (ता.केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्याकांडाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हत्तेचा ह्रद्य पिळवूटन टाकणारा घटनाक्रम मांडला. सुरेश धस यांनी मांडलेल्या घटनाक्रम, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आक्रमकता आणि जनरेट्यामुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात हजर झाला, तर इतर कृष्णा आंधळे वगळता आरोपींना अटक करण्यात आली. यातील कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रियेच्या सुनावण्या सुरु आहेत.


संतोष देशमुख यांच्या हत्तेनंतर मागिल महिन्यात मस्साजोग ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा स्वरुपानंद देशमुख यांनी पराभव केला.


दरम्यान, आश्विनी देशमुख यांच्या पराभवाचे राजकीय पडसाद तर उमटलेच, पण सोशल मीडियावर जरांगे पाटील विरोधकांनी मस्साजोग निवडणुकीचे खापर जरांगे पाटील यांच्यावर फोडले. जरांगे पाटील यांना मस्साजोगची निवडणुक जिंकता आली नाही, मस्साजोग ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांना डावलले,धनंजय देशमुखांनी जरांगे पाटीलांच्या नेतृत्वात निवडणुक लढवली मात्र, ग्रामस्थांनी त्यांना नाकारले अशा विविध तर्कांनी जरांगे पाटील यांना ट्रोल करण्यात आले.

मस्साजोग ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध व्हायला हवी अशी सुरुवातीला सहानुभूतीचे वारे वाहत असताना स्वरुपानंद देशमुख यांनी लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे सांगत आश्विनी देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे मागील पंचवार्षीक निवडणुकीत संतोष देशमुख यांनी स्वरुपानंद देशमुख यांचा अत्यल्प मतांनी पराभव केला होता.


यावर जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला आहे. सोमवारी (दि.18) माध्यमांसी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, संतोष भैय्या देशमुख हत्याकांड आणि गावाची निवडणुक हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. हत्याकांड आणि राजकारण हे दोन्ही विषय वेगळे असताना हत्याकांडला राजकीय चष्म्यातून बघने हा मुर्खपणा आहे. आणि मी त्यांच्या गावच्या राजकारणात कशाला पडू, धनंजय भैय्या आला काय आणि स्वरुपानंद देशमुख आला काय दोन्ही आमचेच आहेत. मी गावच्या राजकारणात कशाला कोणाला विरोध करू?


पण ह्या परळीच्या टोळीला असं वाटतयं की, ट्रोल केल्याने आमच्याशी जुळणार्‍या माणसांची संख्या कमी होईल. पण ते ज्यास्तच चवतळतात. आम्हाला असं कळतंय की, एक आत गेलाय, तो दुसरा त्याच्या सारखाच तयार करतोय. पण परळीतल्या मराठ्यांसोबत आम्ही आहोत. तेही आमच्यासोबत आहेत असे म्हणत त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर निशाना साधला

Comments


bottom of page