ऑपरेशन अभ्यास अंतर्गत प्रशिक्षण वर्ग संपन्न
- Navnath Yewale
- Sep 4
- 1 min read
नागरी संरक्षण दल,पालघर जिल्हा कार्यालयाचे आयोजन; क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षणे

पालघर :संचालक,नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानव्ये ऑपरेशन अभ्यासक्रमांतर्गत नागरी संरक्षण दल,तारापूर यांच्यामार्फत ०७ दिवशीय Civil Defence Capacity Building Training (मास्टर ट्रेनर) हा पाठ्यक्रम दिनांक २४ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पालघर जिल्हा उपनियंत्रक मा.श्री.के.आर.कुरकुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर ऑटोमिक पॉवर स्टेशन १ व २ वसाहतीतील एन.टी. सी हॉस्टेल मधील सभागृहात आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण बोईसर विधानसभा क्षेत्र,विभागीय क्षेत्ररक्षक नरेश अनंत म्हस्के,यांच्या पुढाकाराने आणी मास्टर ट्रेनर सागर मोरे, गौरव पाटील,सुषमा जाधव,प्रिया पाटील यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.

यांनी दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्यात ३६० प्रशिक्षित मास्टर ट्रेनर मार्च २०२६ पर्यंत ३०-३० स्वयंसेवकांची बॅच घेउन एकूण १२ बॅच तयार करण्याचे आदेश आहेत त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात मा.उपनियंत्रक कार्यालय जिल्हा पालघर अंतर्गत बोईसर या ठिकाणी ७ दिवसीय मास्टर ट्रेनर TOT- 4 ह्या बॅच चे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षणादरम्यान विभागीय क्षेत्ररक्षक /मानसेवी निदेशक/मास्टर ट्रेनर नरेश अनंत म्हस्के,विभागीय क्षेत्ररक्षक/मास्टर ट्रेनर भूपेंद्र मिश्रा,मानसेवी निदेशक/मास्टर ट्रेनर नरेंद्र सोलंकी, तसेच मास्टर ट्रेनर प्रिया पाटील,सुषमा जाधव, गौरव पाटील,लोचन तामोरे,वैशाली राऊत,अपेक्षा संखे,सौ.सुवर्णा महामुनी,राहुल तामोरे, यांनी,प्रथमोपचार,आणी आणीबाणीच्या काळात रुग्णास उचलल्या जाणाऱ्या पद्धती,विमोचन,आगीचे वर्गिकरण,
कृतिम स्ट्रेचर,CPR,कोल्याप्स स्ट्रचर,गाठींचे प्रकार,अग्निशम उपकरण,बँडेज,स्नेक बाईट,धोक्याचे इशारा प्रणाली, वॉर्निंग सिस्टम,युद्ध म्हणजे काय इत्यादी विषयांवर नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय मुंबई यांनी ठरवून दिलेल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे व्याख्यान व प्रत्येक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.सदर प्रशिक्षणाचे सांगता समारंभ रविवार दिनांक ३१/०८/२०२५ रोजी नागरी संरक्षण दुर्घटना नियंत्रक अधिकारी माजी.आयुक्त- ठाणे,उल्हास नगर,भिवंडी अशोक कुमार रणखांब यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाले.यावेळी कार्यालयीन अधिकारी.अनंता पिरकर,अनिकेत धोडी,दुर्घटना नियंत्रण अधिकारी अजित राऊत,विभागीय क्षेत्ररक्षक निलेश वझे,भूपेंद्र मिश्रा.इ.मान्यावर उपस्थित होते.



Comments