top of page

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

Updated: Sep 7

ree

बुलढाणा: मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानं राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झालेत. ओबीसी आरक्षण संरक्षणसाठी ओबीसी नेते मोट बांधत आहत,जागोजागी आंदोलन करत आहेत. आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी सकराच्या विरोधात रणशिंग फुकले आहे. दरम्यान ओबीसीसाठी लढा देणार्‍या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकाने ही तक्रार दाखल केली आहे.


मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांच्या हाती आरक्षणाबाबतचा शासन निर्णय सोपविल्यावर राज्यात ओबीसी मराठा वाद सुरू झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणविषयक शासन निर्णय प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तापले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत.


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविषयक शासन निर्णयाची (अध्यादेशाची) प्रत फाडल्यावर वातावरण चांगलेच तंग झाले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. बुलढाणा जिल्हा देखील याला अपवाद ठरला नाही. लक्ष्मण हाके यांच्यावर याप्रकरणी फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार करण्यात आली आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हाकेंविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे दोन समाजात तेढ निर्माण होईल. राज्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सोबतच शासनाने काढलेला अध्यादेश त्यांनी फाडला. त्यांनी संविधानाचाही अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार मराठा आंदोलकाने केली आहे.

Comments


bottom of page