top of page

कल्याणमध्ये मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण

ree

शहरातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत एका 25 वर्षीय मराठी तरुणीला एका परप्रांतीय तरुणाकडून क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या बेदम मारहाणीची घटना सीसीसटीव्हीत कैद झाली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. गोकुळ झा असं मारहाण करणार्‍या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 25 वर्षीय पिडीत तरुणी ही खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. 21 जूलै रोजी रुग्णालयात गोपाल झा नावाचा परप्रांतीय तरुण आला होता. तेव्हा त्यानं डॉक्टरांची भेट घ्यायची आहे, असं सांगितलं. त्यावेळी पीडीत तरुणीनं डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत. तुम्ही जरा थांबा, असं सांगितलं. याच गोष्टिचा राग धरून त्या हल्लेखोर तरुणानं शिवीगाळ करत तरुणीला बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 74,79,115 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडं या मारहाण प्रकरणावरून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,कर्मचार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी गोकुळ झा याला तातडीनं अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

Comments


bottom of page