top of page

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसा निमीत्त वृक्षलागवड

ree


 जव्हार :  तालुक्यातील गंगापूर येथे तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा वाढदिवस वृक्ष लागवड करून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे काँग्रेसचे पालघर जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष बळवंत गावित, तालुकाध्यक्ष संपत पवार पालघर जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक दादा पाटील व जव्हार तालुका काँग्रेस कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विविध सेलचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आंबा, काजू, कडू लिंब, वड, पिंपळ अशा झाडांची लागवड करून तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी संकल्प सोडण्यात आला.

 

देशात संसदेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, राज्यात हर्षवर्धन दादा सपकाळ जसे काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहे तसे प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने करावे असा संदेश बळवंत गावित यांनी दिला. त्यानंतर युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परिसरातील बहुशंक वरिष्ठ कार्यकर्ते या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. श्री पांडुरंग बरतड उपाध्यक्ष जव्हार तालुका काँग्रेस यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. श्री बरतड हे तालुका कार्यालयात रोज येऊन तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचवतात याची दखल घेण्यात आली. नंतर शैलेश कांमडी यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.



Comments


bottom of page