छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनिस्कोच्या यादीत समावेश
- Navnath Yewale
- Jul 13
- 1 min read

महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचं स्मरण करताना प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानानं फुलून येते. युनायटेड नेशन्सच्या युनस्को या जागतिक संघटनेनं देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा दिला आहे. शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
यामध्ये पुणे, सातारा, सिंदुदूर्ग, रायगड, नशिक, कोल्हापुर जिल्ह्यातील किल्ल्यांचा समावेश आहे. पॅरिस येथील युनिस्कोच्या मुख्यालयातून शनिवार (12) रोजी छत्रपती शिवारायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली यामध्ये पुणे- शिवनेरी, लोहगड, राजगड, नाशिक-साल्हेर, रायगड- रायगड, खांदेरी, रत्नागिरी- सुवर्णदूर्ग, सिंदुदूर्ग- सिंदुदूर्ग, विजयदूर्ग, सातारा- प्रतापगड, कोल्हापुर-पन्हाळा अशा महाराष्ट्रातील एकून 11 किल्ल्यांसह तमिळनाडू मधील जींजी किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवर माहिती दिली की, “मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की. संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ठ झाले आहेत. ‘ अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रुला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्वपूर्ण आणि वैशिष्ट्येपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य आहे”
Comments