छावाचे विजय घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण
- Navnath Yewale
- Jul 21
- 2 min read

राज्याच्या कृषी मंत्र्यावर तात्काळ कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले, निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याच्या समोर पत्ते फेकल्याच्या कारणावरुन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. लातूर येथील घटनेने राज्यभरातील मराठा संघटना आक्रमक झाल्या असून विजय घाडगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी असंवेदनशील कृषीमंत्र्यावर कारवाईची मागणी केली. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे कृषीमंत्री सभागृहात शेतकर्यांचे मांडायचे सोडून ऑनलाईन रमी खेळत असतील तर हे या राज्याचं दुर्भाग्य आहे. कर्जाच्या खाईत पडलेला शेतकरी नैराश्येतून आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहे, आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कृषी मंत्री सभागृहात ऑनलाईन रमी खेळतायत या संतापाचे पडसाद रविवारी (20 जूलै) लातूरमध्ये राष्ट्रवादी (अ.प.) पक्षाच्या निर्धार मेळाव्या उमटले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा लातूर येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना निवेदन देण्यासाठी शासकिय विश्रामगृहावर पोहोचले. विजय घाडगे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासमोर कृषीमंत्र्यांच्या निषेधार्थ पत्ते फेकत मागण्याचे निवेदन दिले. शिवाय निष्क्रीय कृषीमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली.
शासकिय विश्रामगृहावरील कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसमवेत छातीत, पोटात, डोळ्यावर जबर माहरण करत तु सुनिल तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकत कृषीमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी का केली म्हणून जबर मारहाण केल्याचा आरोप छावाचे विजय घाडगे यांनी केला आहे. विजय घाडगे यांना जबर मारलगल्याने त्यांच्यावर लातूरच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. मराठा आंदोलक जरांगे पाटील, राजु शेट्टी, रविकांत तुपकर यांनी विजय घाडगे यांच्याशी फोनवरुन संवाद साधत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रात्री उशीरा पर्यंत लातूर शहरात छावाच्या कार्यकर्त्यांकडून घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. विजय घाडगेयांना मारहाण प्रकरणी मराठा संघटनांनी आक्रमक पावित्रा शेतकर्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार्या शेतकर्याच्या मुलास मारहाण करणार्यांची सत्तेची मस्ती जिरवू, त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
लातूर शहरातील रोडच्या बाजूने लावले राष्ट्रवादी निर्धार मेळाव्याचे प्लेक्स छावा कार्यकर्त्यांनी फाडून टाकत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत विजय घाडगे यांच्यावर हल्ला करणार्या राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणसह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मात्र, विजय घाडगे यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याचे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.
Comments