जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलना विरोधात तक्रार !
- Navnath Yewale
- Aug 25, 2025
- 1 min read
अॅड. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांची पोलिसांत धाव

मनोज जरांगे यांना मुंबईत 29 तारखेला आंदेालन करू देण्यात येऊ नये, मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑग्सट रेाजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहेत. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून या आंदोलनाला आता राज्यभरातील मराठा समाजाकडून समर्थन मिळत आहे. अशातच या आंदोलनाला विरोध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे.
मनोज जरांगे यांना मुंबईत 29 तारखेला करू देऊ नये, कारण सदर आंदोलन ही मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकारण आणि कंटम्प्ट ऑफ कोर्ट आहे. त्यामुळे त्वरित त्यांना थांबवा. गुन्हा दाखल करा. अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
राज्यासह मुंबईत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मोठा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत आहेत आणि मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंडा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. असेही गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. मुंबईच्या जीडीपीवर देखील मोठा परिणाम होणार आहे. तेव्हा ही बाब परवडणारी नाही. या विरुद्ध गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त मुंबई, पोलिस अधिक्षक जलना यांना तक्रारी दाखल केल्या आहेत.
लवकरच आझाद मैदान पोलिस स्थानकात आज पोलिस तक्रार देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील जाणार असल्याची माहिती आहे. त्यामळे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनापूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांनी तक्रारींचा डाव आखल्याने याचा आंदोलनावर काही परिणाम होणार का? हे पहावे लागणार आहे.



Comments