केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सहा लाख सह्या! कॉक्रोच जनता पार्टीच्या वेबसाइटवर 10 लाखांवर सदस्य तीच वेबसाइट सरकारने केली बंद; राज बब्बर सरकारवर संतापले
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

सोशल मीडियावर अल्पवधीतच कोट्यवधी फॉलोअर्सचा टप्पा गाठलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढत आहेत. आधी ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर, आता इंस्टाग्राम अकाऊंट आणि वेबसाईटही बंद झाल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न नेटीझन्स आणि सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनाही पडला आहे. एकीकडे केवळ सोशल मीडियातून सक्रीय असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाला मोठं समर्थन मिळत असताना सरकारकडूनच त्यांच्या विरेाधात कारवाई होत असल्याचा अरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत भूमिका मांडल्यानंतर, आता अभिनेते आणि दिग्गज नेते राज बब्बर यांनीही यासंदर्भात ट्विट करत सरकारला लक्ष्य केलं आहे.
सरकारविरोधी भूमिका घेणार्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ वर कारवाई झज्ञली असून त्यांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. ट्विटर अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे. तर, बॅकअप अकाऊंटही हटवण्यात आलं. सोशल मीडियातून तरुणाईची एक वेगळी आणि प्रभावी डिजिटल मोहीम सुरू असतानाच आज कॉक्रोज जनता पार्टीच्या अकाऊंटबाबत सकाळी ही माहिती समोर आली आहे. आर्थात, सरकारकडे अशी कारवाई करण्याची ताकद असते आणि ती वापरण्यात आली आहे, असे म्हणत काँग्रेस नेते तथा दिग्गज अभिनेते राज बब्बर यांनी ट्विटरवरुन मोदी सकरकारला लक्ष्य केलं आहे. तसेच कॉक्रोज जनता पक्षाच्या बाजुने ठामपणे भूमिका मांडली आहे.
भूतकाळात पाहिलं तर, आजचं सरकार सोशल मीडिया मोहिमांचं सर्वात मोठं लाभार्थी राहिलं आहे. मग आता त्याच मोहिमांना दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल राज बब्बर यांनी केला आहे. बदल हा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अवलंबून नसतो, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर असंतोष निर्माण होणं स्वभाविक आहे. बेरोजगारीच्या काळात पेपरफुटीसारख्या घटना म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. भरती परीक्षा घेण्याच्या मागणीवर लाठीमार करणं म्हणजे उद्रेकाला निमंत्रण देण्यासारखं आहे. दोषींना संरक्षण मिळालं, तर तरुणांमध्ये संताप वाढणारच. तरुणांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असलेल्या माध्यमांवर पहारा ठेवण्यापेक्षा, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं अधिक योग्य ठरेल, असे म्हणत राज बब्बर यांनी सरकारला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
झुरळे कधीच मरत नाहीत: अभिजित दिपके
केंद्र सरकारने आमचे संकेतस्थळ बंद केले आहे. 10 लाख जणांनी या संकेतस्थळांवर नोंदणी केली होती. त्यापैकी 6 लाख जणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या नाजीनाम्याची मागणी केली होती. सरकारला कॉक्रोजची इतकी भीती का वाटते? पण सरकारची हुकूमशाही वृत्ती भारतातील तरुणांचे डोळे उघड आहे. आम्ही स्वत:साठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो हाच आमचा एकमेव गुुन्हा आहे. पण तुम्ही इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही. सध्या आम्ही आमच्या एका नवीन घराच्या उभारणीवर काम करत आहोत. झुरळे कधीच मरत नाहीत. कारवाईनंतर अशी प्रतिक्रिया अभिजित दिपके यांनी व्यक्त केली .
ट्विटर, इंस्टा आणि आता वेबसाईटही बंद: कॉक्रोज जनता पक्षाचे अधी एक्स अकाऊंट आणि नंतर इन्स्टा अकाऊंट बदं करण्यात आले होते. एक्स आणि इंन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉक्रोज जनता पार्टीला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये या दोन्ही समाजमाध्यमांवर कॉक्रोज जनता पार्टीचे कोट्यवधी सदस्य झाले होेते. कॉक्रोज जनता पार्टीचे एक्स अकाऊं, अन्स्टा आणि आता वेबसाईट बदं झाल्याने त्यांना संबंधित यंत्रणांनी मोठा झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता कॉक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके काय प्रतिक्रिया देणार अथवा काय पाऊल उचलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



Comments